अधिकाºयांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:15 IST2017-11-12T22:15:36+5:302017-11-12T22:15:49+5:30
गोंदिया तालुक्यातील ग्राम धामनेवाडा येथील ग्रामपंचायत निकालात विजेत्या उमेदवारांना पराभूत दाखविण्यात आले.

अधिकाºयांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : गोंदिया तालुक्यातील ग्राम धामनेवाडा येथील ग्रामपंचायत निकालात विजेत्या उमेदवारांना पराभूत दाखविण्यात आले. प्रकरणी अधिकाºयांकडून न्याय न मिळाल्याने विजयी उमेदवार व गावकºयांनी गुरूवारी (दि.९) ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. गावकºयांचा रोष बघता संबंधीत अधिकाºयांनी प्रकरणाची चौकशी करुन न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने गावकºयांनी आपले आंदोलन मागे घेत ग्रामपंचायला कुलूप ठोकले नाही.
जिल्हाधिकाºयांच्या यादीत दोन पराभूत उमेदवारांना विजयी तर विजयी उमेदवारांना पराभूत दाखविण्याची दुर्दैवी घटना धामनेवाडा येथे घडली होती. या प्रकारामुळे विजयी उमेदवार व त्या वॉर्डातील वातावरण तापले होते. प्रकरणी ्न्याय मिळावा याकरिता विजयी उमेदवार व गावकरी तहसीलदारांच्या भेटीसाठी ही आले होते. मात्र तहसीलदार सुटीवर गेल्याने गावकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या देत गुरूवारी (दि.९) सरपंच पदभार व उपसरपंचांची निवड प्रक्रीया होऊ देणार नाही व ग्रामपंचायतला कुलप ठोकणार असल्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार गुरूवारी (दि.९) उमेदवार व गावकºयांनी कुलूप ठोकण्याची तयारी केली. हा प्रकार थांबविण्याकरीता पोलीस यंत्रणा सज्ज झाली व अतिरीक्त पोलीस तुकडी बोलविण्यात आली होती. या दरम्यान नायब तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधकिारी वाहने, लिपीक कटरे, पोलीस निरीक्षक शितल जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन प्रकरणाचा तपास सुरु असून सत्य समोर येताच न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले.
तर उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी भ्रमणध्वनीवरून महेंद्र भदाडे व मालता कोकुडे यांच्यावर अन्याय झाला असेल तर निश्चितच न्याय मिळवून देवू असे आश्वस्त करुन आंदोलन न करण्यास सांगीतले. अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर विजयी उमेदवार भदाडे व कोकुडे यांच्यासह राजू टेकाम, सोनू तिडके, रामेश्वर कटरे, गजू उईके, जोगेश्वरी रिनाईत, वनमाला जगणित, ममता मेश्राम, देवराज भदाडे सहीत उपस्थित शेकडो नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतला कुलूप ठोको आंदोलन मागे घेतले.