दुर्गम भागातील आरोग्य सेवेत आशांचा वाटा महत्त्वाचा
By Admin | Updated: February 7, 2015 23:27 IST2015-02-07T23:27:36+5:302015-02-07T23:27:36+5:30
आदिवासी दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्यात आशा सेविकांचा महत्वाचा वाटा आहे, असे मत गटप्रवर्तक दिप्ती ब्राम्हणकर यांनी व्यक्त केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात

दुर्गम भागातील आरोग्य सेवेत आशांचा वाटा महत्त्वाचा
सालेकसा : आदिवासी दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्यात आशा सेविकांचा महत्वाचा वाटा आहे, असे मत गटप्रवर्तक दिप्ती ब्राम्हणकर यांनी व्यक्त केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकांसाठी आयोजित हळदीकुंकू व मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख एस.के. दोनोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एल.जी. निपाणे, आरोग्य सेविका योगिता वावरे, राखी प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आशा सेविका व आरोग्य सेविकांना हळदी कुंकू व भेट वस्तू देण्यात आल्या. मार्गदर्शन शिबिरात पाहुण्यांनी आरोग्य सेवेविषयी मत व्यक्त केले.
यात सालेकसा तालुक्यातील कावराबांध ते दरेकसा आरोग्य केंद्रांतर्गत आदिवासी, दुर्गम, डोंगराळ व जंगल व्याप्त गावांत आशा सेविका कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांची आरोग्य सेवेत महत्वाची भूमिका असल्याचे मत दोनोडे यांनी व्यक्त केले. तसेच सालेकसा तालुका सारख्या दुर्गम भागातून प्रसुतीसाठी महिलांना आरोग्य केंद्रात आणणे कठिण कार्य आहे. पण आशांच्या प्रयत्नामुळे या भागात प्रसुती संदर्भात आता जागृती निर्माण झाली असून प्रसुतीचा उच्चांक गाठता येत आहे, असे मत निपाणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरण करुन करण्यात आली. संचालन चंद्रकला ठेकवार यांनी केले. आभार लिला दमाहे यांनी मानले. याप्रसंगी चंद्रकला नागपूरे, गीता धामडे, अनिता सिरशाम, अनिता साखरे, उषा दमाहे, उषा लिल्हारे, पुष्पा लिल्हारे, सरिता मानकर, ममता रसोने, सविता भसारे, चंपा पंधरे, निषा टेंभरे अहिल्या लिल्हारे, रेखा गडघाते, सरिता मेश्राम, सुशिला लिल्हारे मोठ्या संख्येत आशा सेविका उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)