कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

By Admin | Updated: May 17, 2015 01:52 IST2015-05-17T01:52:32+5:302015-05-17T01:52:32+5:30

नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात ...

Asset billions of properties | कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

गोंदिया : नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात २७ आगजळीच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. या आगजळीत कित्येकांच्या रोजीरोटीवर गाज पडली असून कित्येकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले आहे. यातील काही घटनांतील नुकसानीची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही सुमारे दीड कोटींच्या वर मालमत्ता जळून खास झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली आहे.
आग, पाणी आणि हवा या तत्वांपेक्षा शक्तीशाली कुणीही नाही. त्यामुळेच या तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आग जाळून खाक करते. पाणी बुडवून टाकते. तर हवा आपल्या पाशात घेऊन उडवून टाकते. या तत्वांपासून कितीही सावधानी बाळगली तरिही या तत्वांच्या तडाख्यापासून कुणीही बचावू शकलेला नाही. याची प्रचिती विविध घटनांच्या माध्यमातून येत राहते. यात आग या तत्वाकडे लक्ष दिल्यास सन २०१५ च्या सुरूवातीच्या साडेचार महिन्यांत तब्बल २७ घटना घडल्या आहेत.
आगजळीच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी गोंदियात अग्निशमन कार्यालय असून येथूनच जिल्ह्यात सेवा दिली जाते. या २७ घटनांतील १५ घटना शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. वर्षाच्या सुरूवातीच्या फक्त साडेचार वर्षांतील हा आकडा बघता जिल्हा हादरून गेला आहे. यात आगजळींच्या घटनांची महिन्यानुसार आकडेवारी बघितल्यास जानेवारी महिन्यात सहा, फेब्रुवारी महिन्यात तीन, मार्च महिन्यात ४, एप्रिल महिन्यात सात तर सुरे असलेल्या मे महिन्याच्या १५ दिवसांत सात घटना घडल्या आहेत.
या सर्व घटनांना बघता हे वर्ष खरोखरच काहींना भाग्याचे लागले असेल यात शंका नाही. मात्र आगजळींच्या घटनांत आपले सर्व काही गमावून बसलेल्यांना विचारल्यास त्यांच्या डोळ््यात अश्रूच दिसणार. (शहर प्रतिनिधी)
घर जळण्याच्या घटना अधिक
आगजळी या घटनांत १५ घटना शहराबाहेरील आहेत. असून त्यातही घर व गोठे जळण्याच्या १३ घटना घडल्या आहेत. तर अन्य घटनांत गोदाम, पानटपऱ्या दुकान आदिंचा समावेश आहे. यामुळेच या अग्नितांडवात कित्येकांच्या घरावरचे छत हिरावल्या गेले. तर कित्येकांच्या रोजीरोजीवरच गाज पडल्याचे दिसून येते. कारण जानेवारी महिन्यांतील घटनांत तीन लाख १० हजार रूपये, फेब्रुवारी महिन्यात तीन लाख ७५ हजार रूपये, मार्च महिन्यात सात लाख ५० हजार रूपये, एप्रिल महिन्यात २४ लाख ५० हजार रूपये तर मे महिन्यात एक कोटी पाच लाख ५० हजार रूपयांची मालमत्ता जळून खाल झाली आहे. विशेष म्हणजे यातही काही घटनांतील झालेल्या नुकसानीची नोंद नाही. अन्यथा नुकसानीची ही आकडेवारी आणखी वाढणार.

Web Title: Asset billions of properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.