जिल्हास्तरीय भीमगीत गायन स्पर्धेत अस्मिता पंचभाई प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:30 IST2021-04-27T04:30:02+5:302021-04-27T04:30:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा गोंदियाच्यावतीने संदीप तिडके, किशोर डोंगरवार यांच्या संकल्पनेतून ...

Asmita Panchbhai first in district level Bhim Geet singing competition | जिल्हास्तरीय भीमगीत गायन स्पर्धेत अस्मिता पंचभाई प्रथम

जिल्हास्तरीय भीमगीत गायन स्पर्धेत अस्मिता पंचभाई प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा गोंदियाच्यावतीने संदीप तिडके, किशोर डोंगरवार यांच्या संकल्पनेतून कोरोनासदृश्य परिस्थितीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांसाठी स्वरचित भीमगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील ९ शिक्षकांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, गोंदियाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ऑनलाईन पद्धतीने स्वरचित भीमगीत गायन स्पर्धा आयोजित करून १३० वी जयंती साजरी करण्यात आली. या काव्यलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील ९ स्पर्धकांनी स्वलिखित भीमगीत गायन स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कवी अस्मिता पंचभाई यांनी ‘वंदन करूया...’ या काव्यरचनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षशील जीवनावर प्रकाश टाकत स्पर्धेत पहिला क्रमांक प्राप्त केला.

Web Title: Asmita Panchbhai first in district level Bhim Geet singing competition