अस्वलाने केली टरबुजाची नासाडी
By Admin | Updated: March 21, 2015 01:58 IST2015-03-21T01:58:00+5:302015-03-21T01:58:00+5:30
तालुक्यातील कोकणा या गावात अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला असून परिसरातील २५ एकरातील टरबुजांची नासाडी केली आहे.

अस्वलाने केली टरबुजाची नासाडी
सडक-अर्जुनी : तालुक्यातील कोकणा या गावात अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला असून परिसरातील २५ एकरातील टरबुजांची नासाडी केली आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांची नुकसान झाले असून वन विभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
कोकणा हे गाव कोहमारा सहायक वनपरिक्षेत्रांतर्गत येते. गावालगत नवेगाव व्याघ्र असून प्रकल्पातील वन्य प्राणी गावाच्या दिशेने येवून उस, टरबुज, ढेमस आदी पिकांचे नासाडी करताना दिसतात. सध्या टरबुजाचे पीक तोडणीच्या मार्गावर असताना अस्वलांचा उपद्रव वाढला असून मोठमोठे टरबुज फोडणे व फेकण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. महागडी बियाणे व किटकनाशकांची फवारणी करुन टरबुजांचे भरघोस उत्पादन घ्यावे या बेतात शेतकरी आहे. अशात मात्र वण्यप्राण्यांकडून होत असलेल्या नासाडीमुळे लावलेला खर्च ही पाण्यात जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अस्वलाच्या उपद्रवामुळे कोकणा येथील टीकाराम पाऊलझगडे, रेवदास दरवडे, कोंडू भेंडारकर, गणपत कापगते चैतराम शहारे, गणपत पाऊलझगडे, डॉ. श्याम दीक्षित, शिवाजी गहाणे, शेमराज भेंडारकर, व्यंकट रहेले, भास्कर भेंडारकर मोतीराम पाऊलझगडे, मनोहर पाऊलझगडे, चोपराम गहाणे आदी अनेकांच्या पिकाची नासाडी झाली.