शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

थर्ड लाइनच्या कामामुळे ४ ते २० ऑगस्ट दरम्यान तब्बल ७२ रेल्वेगाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:05 IST

प्रवाशांना फटका : ४ ते २० ऑगस्टदरम्यान चालणार काम

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाअंतर्गत राजनांदगाव ते कळमना दरम्यान तिसऱ्या लाइनचे काम प्रगतिपथावर आहे. इलेक्ट्रनिक्स इंटरलॉकिंगचे कार्य सुरू असल्यामुळे ४ ते १३ ऑगस्ट व नॉन लॉकिंगच्या कामामुळे १४ ते २० ऑगस्टपर्यंत १६ प्रवासी गाड्या व ५६ जलद रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

राजनांदगाव ते कळमना या २२८ किमी अंतरावर तिसऱ्या लाइनचे निर्माण कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रगतिपथावर असलेल्या लोहमार्गाच्या इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे ४ ते २० ऑगस्टदरम्यान अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत प्रवासांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

७ ते १९ दरम्यान या रेल्वेगाड्या रद्दडोंगरगड-गोंदिया- डोंगरगड क्र. ०८७११/१२, गाडी इतवारी मेमो गाडी क्र.०८७१३, इतवारी- गोंदिया मेमो गाडी क्र. ०८७१६, इतवारी-रामटेक गाडी क्र.०८७५६, रामटेक-इतवारी गाडी क्र. ०८७५१, इतवारी-रामटेक मेमो गाडी क्र. ०८७५४/५५, इतवारी-तिरोडा मेमो गाडी क्र. ०८ २८१/८२, तिरोडी- तुमसर-तिरोडी गाडी क्र. ०८२८३/८४, इतवारी-बालाघाट-इतवारी गाडी क्र. ०८७१४/१५, रायपूर-इतवारी-रायपूर गाडी क्र. ०८२६८/६७, कोरबा-इतवारी गाडी क्र. १८२३९, इतवारी-बिलासपूर-इतवारी गाडी क्र. १२८५६/५५, इतवारी-बिलासपूर गाडी क्र. १८२४०, टाटानगर गाडी क्र. १८१०९/१०, नागपूर-सहडोल-नागपूर गाडी क्र. ११२०१/०२, हावडा-अहमदाबाद-हावडा गाडी क्र. १२८३३/३४, हावडा-मुंबई गीतांजली गाडी क्र. १२८५९/६०, कोरबा- अमृतसर ही गाडी ४ ते ९ ऑगस्ट व १५ ऑगस्ट रोजी तर अमृतसर-बिलासपूर ही रेल्वेगाडी ६ ते ११ ऑगस्ट व १७ ऑगस्ट रोजी रद्द राहणार आहे. शालिमार गाडी क्र. १८०३०/२९ ही गाडी ११ ते १७ व १३ ते १९ ऑगस्टला रद्द राहणार आहे. याशिवाय अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक रेल्वे गाड्यांचा मार्ग बल्लारशा-गोंदिया या मागनि वळविण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेgondiya-acगोंदियाMaharashtraमहाराष्ट्र