कृत्रिम पाणवठा :
By Admin | Updated: May 17, 2015 01:43 IST2015-05-17T01:43:49+5:302015-05-17T01:43:49+5:30
वातारणात अचानक बदल होऊन अलीकडे गारा, पाऊस, हवा व वादळ आल्याने ...

कृत्रिम पाणवठा :
वातारणात अचानक बदल होऊन अलीकडे गारा, पाऊस, हवा व वादळ आल्याने नागझिरा अभयारण्यात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात पाला-पाचोळा, गाळ जमा झाला होता. वन्यजीव विभाग व सातपुडा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाणवठे स्वच्छता मोहीम हातात घेऊन अभयारण्यातील संपूर्ण पाठवठ्यांची स्वच्छता करणे सुरू आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे. या कामासाठी वन्यजीव विभागाचे वनरक्षक कहुडकर, कापसे व इतर वनमजूर तसेच सातपुडा फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी मुकुंद धुर्वे, जीवराज सलाम, सलीमकुमार धुर्वे व मंगेझरी येथील तरूण वन्यप्रेमी यांनी सहकार्य केले.