अर्जुनी बाजार समितीत धान खरेदी सुरू
By Admin | Updated: November 11, 2015 01:16 IST2015-11-11T01:16:42+5:302015-11-11T01:16:42+5:30
आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन कृउबासचे सभापती काशीम जमा कुरैशी, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष नामदेवराव कापगते यांच्या हस्ते करण्यात आले.

अर्जुनी बाजार समितीत धान खरेदी सुरू
अर्जुनी-मोरगाव : आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन कृउबासचे सभापती काशीम जमा कुरैशी, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष नामदेवराव कापगते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावर्षीचे कमिशन, गोदाम भाडे, शासनावर थकीत असल्याने कुणीही गोदाम मालक यावर्षी गोदाम किरायाने देण्यास तयार नव्हते. यामुळे धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही, याविषयीचा संभ्रम शेतकरी वर्गात होता. ऐन दिवाळी तोंडावर जर शेतकऱ्याचे बाजारात बेभाव धान विकला असता तर आधीच नापिकी, दुष्काळ, यामुळे त्रस्त शेतकऱ्यांचे बेहाल झाले असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन संस्थांच्या विनंतीला मान देत कृषी उत्पन्न बाजार समितीने गोदाम भाड्याने देणे मान्य केले असल्याचे खरेदी-विक्रीचे अध्यक्ष नामदेवराव कापगते यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरु नये, त्यांची हलाकीची स्थिती बघून खासगी गोदाम मालकांनी संस्थांना गोदाम उपलब्ध करुन द्यावे, आम्ही धान खरेदी सुरू करू, मात्र ते पुरेसे नाही. केंद्रावरील ग्रेडरने शेतकऱ्यांचेच धान मोजावे. व्यापाऱ्यांना थारा देऊ नये, शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावरच धान विकण्याचे आवाहन कापगतेंनी केले.
यावेळी कृउबास उपसभापती लायकराम भेंडारकर, खरेदी विक्री उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, पोमेश रामटेके, मुरलीधर झोडे, रघुनाथ लांजेवार, काशिवार, नारायण सिडाम, गोवर्धन डोंगरवार, शासनाचे प्रतिनिधी कोहाडकर उपस्थित होते.