‘आरती’च्या मारेकऱ्यांना अटक करा

By Admin | Updated: September 14, 2015 01:40 IST2015-09-14T01:40:21+5:302015-09-14T01:40:21+5:30

देवरी तालुक्याच्या सोनारटोला येथील बाराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आरतीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली. मात्र आरोपी अद्याप मोकाटच आहेत.

Arrest the killers of 'Aarti' | ‘आरती’च्या मारेकऱ्यांना अटक करा

‘आरती’च्या मारेकऱ्यांना अटक करा

आई-वडिलांची आर्त साद : पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
गोंदिया: देवरी तालुक्याच्या सोनारटोला येथील बाराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आरतीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली. मात्र आरोपी अद्याप मोकाटच आहेत. तिच्या मारेकऱ्यांना अटक करून तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी ‘सेवा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे ११ सप्टेंबरला केली.
आरती बारसे हिचे आई-वडील मोठ्या मुलीच्या घरी रायपूरला गेले होते. ती व तिचा भाऊ संजय घरी होते. सकाळी संजय घराबाहेर गेल्यावर ती एकटीच होती. तिला घरी एकटीच पाहुन तीन ते चार नराधमांनी तिच्याशी बळजबरी करून तिची हत्या केली. तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळले व समोरच्या विहिरीत टाकले. ही घटना १८ आॅगस्ट रोजी घडली. या घटनेला बराच कालावधी निघून गेल्यावरही मारेकऱ्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.
यात प्रमुख आरोपी योगराज (मुन्ना) हेमराज चकोले (२८) असून त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी आरतीचे आई-वडील व गावातील नागरिक करीत आहेत. आरोपी योगराज चकोले हा सहा महिन्यांपूर्वी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असतानासुद्धा तो आरतीची छेडखानी करीत होता. ही गोष्ट तिने आपल्या मामाला सांगितली होती. यावर तिच्या मामाने त्याला समज दिली होती. याचाच वचपा काढण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आरतीचे आई-वडील व गावकऱ्यांनी ‘सेवा’च्या पदाधिकाऱ्यांजवळ केला. (प्रतिनिधी)

Web Title: Arrest the killers of 'Aarti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.