क्षेत्रभेटीत ३० विद्यार्थ्यावर मधमाशांचा जोरदार हल्ला
By Admin | Updated: November 22, 2014 23:04 IST2014-11-22T23:04:10+5:302014-11-22T23:04:10+5:30
क्षेत्र भेटीसाठी सालेकसा तालुक्याच्या कचारगड येथील गृहेत गेलेल्या ३० विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यात ते विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शनिवारच्या दुपारी २.४५ वाजता घडली.

क्षेत्रभेटीत ३० विद्यार्थ्यावर मधमाशांचा जोरदार हल्ला
गोंदिया : क्षेत्र भेटीसाठी सालेकसा तालुक्याच्या कचारगड येथील गृहेत गेलेल्या ३० विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यात ते विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शनिवारच्या दुपारी २.४५ वाजता घडली.
गोरेगावच्या जिल्हा परिषद शाळा (शहिद जान्यातिम्या) ७२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट सालेकसा तालुक्याच्या कचारगड येथे नेण्यात आली. गुहेतील मंदिरात विद्यार्थी प्रवेश करीत असताना अचानक या मंदिरातील मधमाशाच्या पोळ्यामधील माशा विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून आल्या. त्यात मधमाशानी विद्यार्थ्यांचा चावा घेतला. या गुहेत शिक्षक टी.पी. बंसोड समोर होते. तर मुलांसोबत संजय आखरे, प्रकाश रहांगडाले हे शिक्षक होते. मधमाशानी विद्यार्थ्यावर हल्ला करताच आरडाओरड केली.
यावेळी मागे असलेल्या विद्यार्थ्यानी गुहेत प्रवेश न करता मागेच पळ काढला. त्यामुळे बाकीचे विद्यार्थी या हल्यापासून बचावले. मधमाशाच्या हल्यात ३० विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्या प्रथमोपचार दर्रेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. २७ विद्यार्थ्यांच्या उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली तर सहा विद्यार्थीनी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांचावर उपचार सुरूच होता. उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनीमध्ये दिप्ती पटले, पायल बोरकर, भाग्यश्री मेश्राम, रत्नशिला रहांगडाले, रोहिनी वासनिक, लक्ष्मी शरणागत यांचा समावेश आहे. तर उपचारानंतर सुट्टी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आरती राजेंद्र शहारे, हिना सुरेश पटले, मनिष शंकर पारधी, मयूर पुष्पराज येळे, पायल धनंजय बोरकर, आशिष शामलाल चव्हाण, प्रज्ञा इद्रपाल अंबादे, प्रकाश डिलीराम बिसेन, नंदकिशोर भास्कर मेश्राम, अनिलकुमार प्रितमलाल टेंभरे, दिपक लोकचंद करंजेकर, भूमेश्वर दसाराम वरखडे, दिपक फनिंद्रनाथ रहांगडाले, दुर्गा चंद्रभान मस्करे, रोहिनी वासनिक, गुलशन गजानन रहांगडाले, किशोर होलचंद पारधी, किरण देवचंद मेश्राम, सफलता श्यामराव कटरे, भाग्यश्री योगेश्वर मेश्राम, रत्नशिला दयाराम रहांगडाले, नेहा रामकृष्ण चौरागडे, रत्नशिला रहांगडाले हिरडामाली, अनूप एकनाथ वलथरे, प्रशांत बिसेन, काजल योगेंद्र शहारे व राहुल मेघराज कटरे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्यात शिक्षक संजय आकरे, टी.पी. बंसोड व प्रकाश रहांगडाले हे तिन्ही जखमी झाले. जखमीवर उपचार करून घेण्यासाठी पं.स. सभापती छाया बल्हारे, राकेश शर्मा, केवलराम भैसारे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)