डिजीटलायजेशनमधून अर्जुनी शाळा प्रगतीकडे

By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:56+5:302016-06-02T01:21:56+5:30

रावणवाडी केंदांतर्गत येणाऱ्या अर्जुनी येथील जि.प.पूर्व माध्यमिक शाळा लोकसहभागातून डिजीटल करण्यात आली.

Arjunic schools progress in digitalization | डिजीटलायजेशनमधून अर्जुनी शाळा प्रगतीकडे

डिजीटलायजेशनमधून अर्जुनी शाळा प्रगतीकडे

गावकऱ्यांचा सहभाग : दानदात्यांचा केला सत्कार
खातिया : रावणवाडी केंदांतर्गत येणाऱ्या अर्जुनी येथील जि.प.पूर्व माध्यमिक शाळा लोकसहभागातून डिजीटल करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण समितीचे सभापती पी.जी. कटरे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष उषाताई मेंढे, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, जि.प. सदस्य विजय लोणारे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, गर्रा पंचायत समिती सदस्या माधुरी हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी अशोक बरईकर, केंद्रप्रमुख ए.आर. ठाकरे, अर्जुनी सरपंच पृथ्वीराज रहांगडाले, शाळा प्रबंधन समिती अध्यक्ष किशोर रहांगडाले, मुख्याध्यापक के. एच. रहांगडाले, उपाध्यक्ष संगीता तुरकर, तंमुसचे अध्यक्ष एस.एम. पटले, शिक्षक देवलाल खैरवार, उपसरपंच सुरजलाल खोटेले, पोलीस पाटील ओमप्रकाश शहारे, प्रल्हाद उके, नरेंद्र गजभिये, कोमलकुमार नंदागवळी उपस्थित होते.
यावेळी सरस्वती माता व अन्य महापुरूषाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिप प्रज्वलीत केले. यावेळी शिक्षणाधिकारी उल्हास नरड म्हणाले, घराघरामध्ये ज्ञान रचनावाद व्हावा जेणेकरून मुलामध्ये बुध्दीचा विकास व्हावा हेच खरे आपल्या देशाचा भविष्य आहे. कार्यक्रमाच्या वतीने स्व. दीपक खैरवार यांच्या स्मृतीत ३० हजार रुपयाचा प्रोजेक्टर शाळेला दिल्याबद्दल शिक्षक देवलाल खैरवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रस्तावना मुख्याध्यापक के. एच. रहांगडाले यांनी, संचालन सुनंदा ब्राह्मणकर तर आभार यु.डी. गजभिये यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांद्वारे तयार केलेल्या कलाकृतीचे निरीक्षण करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Arjunic schools progress in digitalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.