शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात ध्वजारोहणास छगन भुजबळांच्या नकाराने तर्कवितर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:50 IST

पालकमंत्री नाराजी नाट्याची झळ पोहोचल्याची चर्चा : महायुतीत धुसफूस कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा पेच अद्यापही कायम आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत यावरून धुसफुस आणि वाद कायम आहे. याच वादाची झळ आता विदर्भातील गोंदिया जिल्ह्यालाही बसली आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाला कोण कुठे ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली. गोंदियाला ध्वजारोहणाची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याने आता मंत्री मंगलप्रसाद लोढा हे ध्वजारोहण करणार आहेत.

मंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे असल्याने त्यांना तेथे ध्वजारोहण करण्याची इच्छा होती. पण तो मान भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलल्या जाते. एकूणच पालकमंत्री पदावरून महायुतीत मतभेद उफाळून आले असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचेच मंत्री बाबासाहेब पाटील आहेत. पण त्याची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे गोंदियाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली होती. पण त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिल्याची माहिती आहे.

नाशिकचा मान न मिळाल्यानेच गोंदियास नकार२०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होत असल्याने नाशिक पालकमंत्रिपदासाठी तिन्ही पक्ष दावा करत आहे. राज्य सरकारकडून नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात आल्याने शिवसेना नेते दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याची संधी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांनी गोंदियामध्ये ध्वजारोहण करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे.

महायुतीत ऑलबेल नाहीचभुजबळ यांच्या नकारामुळे ते भाजप व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याचे बोलल्या जाते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांची समजूत न काढता त्यांच्या नकारानंतर तत्काळ निर्णय घेत ही जबाबदारी लोढा यांच्याकडे सोपवली. यावरून मुख्यमंत्री ज्येष्ठ मंत्र्यांच्या नाराजीला भीक घालत नसल्याचे स्पष्ट आहे. महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आधिच भाजपवर नाराज आहे. आता राष्ट्रवादीचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत ऑलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोंदियाचे पालकमंत्रिपद चर्चेचा विषय

  • गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नेहमीच चर्चेचा विषय आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत पाच पालकमंत्री मिळाल्याचा इतिहास सुध्दा जिल्ह्याच्या नावावर आहे.
  • माजी मंत्री राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत जिल्ह्याला सर्व पालकमंत्री हे बाहेरीलच लाभले.
  • जिल्हाबाहेरील पालकमंत्री असल्याने त्यांचे दर्शन किमान १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला तरी होईल अशी अपेक्षा जिल्हावासीयांनी होती पण ती सुध्दा फोल ठरली.

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाChhagan Bhujbalछगन भुजबळIndependence Dayस्वातंत्र्य दिन