शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

स्थापत्य अभियंत्याने केली काकडीची शेती परंपरागत शेतीला बगल

By admin | Updated: May 8, 2014 23:52 IST

तालुक्यातील बबई येथील स्थापत्य अभियंता रवी झामसिंग बघेले यांनी आपल्या चार एकरच्या शेतीमध्ये परंपरागत धान शेतीला बगल देत काकडीची शेती लावली.

साडेचार एकर जमिनीत काकडीचे पीक

दिलीप चव्हाण - गोरेगाव

तालुक्यातील बबई येथील स्थापत्य अभियंता रवी झामसिंग बघेले यांनी आपल्या चार एकरच्या शेतीमध्ये परंपरागत धान शेतीला बगल देत काकडीची शेती लावली. या शेतीच्या उत्पन्नातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधीजवळ सांगितले. बघेले यांची ३० एकर जमीन आहे. निव्वळ धान शेती करून काहीएक फायदा होत नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या चार एकर जमिनीवर काकडी, कारले, कोहळा, लवकीची झाडे लावली आणि लाखोचे उत्पन्न काढले. २० मार्च २०१४ रोजी बघेले यांनी काकडीचे रोपन केले. आजघडीला त्यांनी १५ टन माल बाजारात विकला लग्नसराईच्या या दिवसात बाजारात काकडीची मोठी मागणी आहे. त्यामुळे त्यांना त्याचा चांगला मोबदलाही मिळाला. दरदिवसी बघेले पाच क्विंटल काकडी बाजारात विकायला नेतात. ८० दिवसात काकडीचे झाड शेवटच्या टप्यात येते. काकडीचे झाड लावण्याच्या ४० दिवसानंतर पीक येते. पुढे गोंदियाच्या बाजारात होलसेलच्या भावात काकडीची विक्री केली जाते. बघेले यांनी काकडीचे उत्पन्न अधिक व्हावे म्हणून शेणखताचा वापर केला. सोबतच काकडीच्या पिकाभोवती मक्याचे झाड लावले. मक्याचे झाड लावल्यामुळे मक्यावर बसणारे किडे, काकडीच्या झाडावर बसणार्‍या किड्यांना भक्ष्य करतात. त्यामुळे काकडीला आलेल्या फुलांची नासाडी होत नाही. फुले झळत नाही, असे त्यांनी सदर प्रतिनिधीजवळ सांगितले. विशेष म्हणजे रवी बघेले सर्वशिक्षा अभियानात कंत्राटी स्थापत्य अभियंता होते. १० वर्षे त्यांनी सेवा दिली. पुढे सेवा समाप्तीचे निकष पुढे करून शासनाने त्यांना पदमुक्त केले. पदमुक्त झाल्यावर त्यांनी निराश न होता शेती करण्याचे धाडस केले. ३० एकर जमिनीपैकी फक्त चार एकड जमिनीवर त्यांनी काकडी लावली आणि शेतीच सर्वोत्तम आहे, हे दाखवून दिले. यासाठी त्यांनी केलेल्या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळाले.