आदिवासी संस्थेला धान खरेदीची मंजुरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:36+5:302021-01-16T04:33:36+5:30

सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा व रोंढा येथील शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी सालेकसा येथील आदिवासी सेवा सहकारी ...

Approve the purchase of paddy by the tribal organization | आदिवासी संस्थेला धान खरेदीची मंजुरी द्या

आदिवासी संस्थेला धान खरेदीची मंजुरी द्या

सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा व रोंढा येथील शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी सालेकसा येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेला मंजुरी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनातून सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा व रोंढा येथील शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी सालेकसा येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेला मंजुरी द्या, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करा, कृषी पंपांसाठी वीज विभागाने निश्चित केल्याप्रमाणे वीजपुरवठा करावा, तलाव खोलीकरण वदस दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. ७ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास, तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याचा, तसेच संबंधित अधिकारी, आमदार व मंत्र्यांचा घेराव करण्याचा इशारा दुर्गा तिराले, निंबाचे सरपंच वरखडे, उपसरपंच मुन्ना मच्छिरके, दोन्ही गावांचे शीतकरी महिला, पुरुष, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम बोहरे, प्रभाकर दोनोडे, गोपाल तिराले, सुशील तिराले, कमलेश लिल्हारे, महिला तालुकाध्यक्ष रेखा ओकटे, पटले दिला.

Web Title: Approve the purchase of paddy by the tribal organization