वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदीस त्वरित मान्यता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST2021-04-25T04:29:20+5:302021-04-25T04:29:20+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. देवरी, आमगाव व सालेकसा या तालुक्यातील ...

वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदीस त्वरित मान्यता द्या
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. देवरी, आमगाव व सालेकसा या तालुक्यातील आरोग्य सेवा बळकट करून येथील लोकांचे चांगल्याप्रकारे उपचार व्हावे याकरिता सर्व ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य यात ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर, व्हायटल साईन मॉनिटर वितरण करण्याकरिता स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांच्या निधीला खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करून सदर निधी जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया यांना उपलब्ध करुन देण्याबाबत म्हटले आहे. या आशयाचे पत्र आमदार सहषराम कोरोटे यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी यांना देऊन त्वरित प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याची मागणी केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याकरिता विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा या तालुक्यांतील आरोग्य सेवा बळकट करून येथील लोकांचे चांगल्याप्रकारे उपचार व्हावे याकरिता सर्व ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य यात ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर व व्हायटल साइन मॉनिटर वितरण करण्याकरिता माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांच्या निधीला खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करून सदर निधी जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया यांना उपलब्ध देण्यास सांगितले आहे. याबाबतचे पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.