घरकूल यादीला त्वरित मंजुरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:53+5:302021-08-24T04:32:53+5:30

देवरी : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या म्हैसुली ग्रामपंचायत येथील घरकूल लाभार्थ्यांचे नाव मंजूर यादीत समाविष्ट करण्याकरीता संबंधित विभागाकडून पैशांची ...

Approve the household list immediately | घरकूल यादीला त्वरित मंजुरी द्या

घरकूल यादीला त्वरित मंजुरी द्या

देवरी : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या म्हैसुली ग्रामपंचायत येथील घरकूल लाभार्थ्यांचे नाव मंजूर यादीत समाविष्ट करण्याकरीता संबंधित विभागाकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप लोकजागृती मोर्चाने केला आहे. घरकूल यादीला त्वरित मंजुरी देण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

म्हैसुली ग्रा.पं.मधील मागील ग्रामसभेतील ठरावाप्रमाणे एकूण घरकूल लाभार्थ्यांची संख्या ६३ अशी आहे. परंतु या घरकूल मंजूर लाभार्थ्यांचे पं.स.स्तरावर घरकूल बांधकामासाठी पूर्ण दस्तावेजासह फाईल तयार करीत असताना संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावावर पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप केला आहे. याची लेखी तक्रारसुध्दा काही लाभार्थ्यांनी केली आहे. म्हैसुली येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी केली. म्हैसुली ग्रा.पं.मधील घरकूल लाभार्थ्यांची यादी त्वरित मंजुरी देण्याची मागणी गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांना दिलेल्या निवेदनातून लोकजागृती मोर्चाने केली आहे.

Web Title: Approve the household list immediately