चार पेयजलपूर्ती योजनांना मंजुरी

By Admin | Updated: June 26, 2017 00:26 IST2017-06-26T00:26:15+5:302017-06-26T00:26:15+5:30

विधानसभा क्षेत्रातील ग्राम आवरीटोला, जानाटोला, पोवारीटोला व मोगर्रा येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल

Approval of four drinking water supply schemes | चार पेयजलपूर्ती योजनांना मंजुरी

चार पेयजलपूर्ती योजनांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा क्षेत्रातील ग्राम आवरीटोला, जानाटोला, पोवारीटोला व मोगर्रा येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पेयजलपूर्ती योजनांना मंजूरी मिळाली आहे. या चार योजनांच्या मंजूरीसाठी आमदार गोपलादास अग्रवाल प्रयत्नशील होते व त्यांनी सन २०१६-१७ च्या पाणी पुरवठा योजना कृती आराखड्यात या योजनांचा समावेश करून शासनाकडे सादर केला होता. मंत्रालयस्तरावर सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर या चार योजनांना मंजूरी मिळाली. त्यामुळे आता लवकरच या गावातील पेयजलपूर्त योजनांचे निर्माण कार्य सुरू होण्याची शक्यता आहे.
योजनांना मंजूरी मिळवून दिल्याबद्दल आमदार अग्रवाल यांचे पंचायत समित सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, पोवारीटोलाचे सरपंच मेंढे, उपसरपंच तारकेश्वर चौधरी, श्याम गणवीर, रंजीत गणवीर, अशोक गणवीर, चंद्रमणी गणवीर, सरपंच वाढई मोगर्राचे माजी सरपंच नागपूर आदिंनी आभार मानले.

Web Title: Approval of four drinking water supply schemes