कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:11 IST2018-12-18T23:10:39+5:302018-12-18T23:11:45+5:30

मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करताच राज्यात शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासीक निर्णय घेतल्याबद्दल आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेत त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना गोंदिया येथे येण्याचे निमंत्रण दिले.

Appreciation of the historic debt waiver | कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक

कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक

ठळक मुद्देअग्रवाल यांनी घेतली कमलनाथ यांची भेट : गोंदियाला येण्याचे दिले निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करताच राज्यात शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासीक निर्णय घेतल्याबद्दल आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेत त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना गोंदिया येथे येण्याचे निमंत्रण दिले.
कमलनाथ व आमदार अग्रवाल यांचे मागील अनेक वर्षांपासून पारिवारीक संबंध आहेत.त्यामुळेच कमलनाथ हे आमदार अग्रवाल यांच्या निवडणुकीत प्रचाराकरीता येतात. या संबंधांमुळे कमलनाथ यांच्या शपथ ग्रहण सोहळ््याला आमदार अग्रवाल हे आवर्जून उपस्थित होते. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण करताच राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला.
याबद्दल आमदार अग्रवाल यांनी कमलनाथ यांची भेट घेऊन कर्जमाफीच्या ऐतिहासीक निर्णयाबद्दल शुभेच्छा देत कौतुक केले. एवढेच नव्हे तर आमदार अग्रवाल यांनी जिल्हा कॉँग्रेस कमिटी गोंदियात त्यांचा नागरीक सत्कार समारंभ आयोजित करण्यास इच्छूक असल्याने त्यांना गोंदियात लवकरात लवकर येण्यासाठी निमंत्रण दिले.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्यासोबत आमदार सुनील केदार, माजी आमदार मधू भगत होते. आमदार अग्रवाल यांनी कमलनाथ यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश निश्चितच विकासाची नवी गती प्राप्त करणार. त्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाने ते शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी किती गंभीर आहे याची प्रचिती आल्याचीही प्रतिक्रीया व्यक्त केली.

अग्रवाल यांच्या प्रयत्नाने तीन जागांवर विजय
मध्यप्रदेश राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार अग्रवाल यांना बालाघाट जिल्ह्याचे पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या प्रयत्नाने बालाघाट विधानसभा क्षेत्रातील सहा पैकी तीन जागांवर कॉँग्रेसने आपला झेंडा फडकाविला. तसेच सोबतच अपक्ष निवडून आलेले गुड्डा जायस्वाल यांचा कॉँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश करविला हे विशेष.

Web Title: Appreciation of the historic debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.