पोलीस मुख्यालयात योग शिक्षकाची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST2021-08-23T04:30:53+5:302021-08-23T04:30:53+5:30

गोंदिया : प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात योगशिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू ...

Appoint a yoga teacher at the police headquarters | पोलीस मुख्यालयात योग शिक्षकाची नियुक्ती करा

पोलीस मुख्यालयात योग शिक्षकाची नियुक्ती करा

गोंदिया : प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात योगशिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू मंगेश त्रिवेदी, मनीष कुमार मिश्रा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदनसुध्दा त्यांना देण्यात आले.

पोलीस कर्मचारी अधिक वेळ आपल्या कुटुंबापासून दूर राहून अनेक प्रकारच्या ताण-तणावाने ग्रस्त असूनही सेवेत तत्पर असतात. त्यांचे स्वास्थ्य सुरक्षित राहावे, या हेतूने तसेच ते तणावरहीत राहून तणावमुक्त जीवनशैलीत पूर्ववत ऊर्जायुक्त कार्य करण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात एक महिला व एक पुरुष योग प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना नियमित योग शिकवून व त्यांच्याकडून योग करून घेऊन त्यांना कोविड काळात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. उत्तम जीवनशैलीसाठी योग उपयुक्त आहे. देशात लाखो कुशल योग शिक्षक आहेत. पोलीस मुख्यालयात योग शिक्षकाची नियुक्ती केल्यास अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे यावर विचार करण्याची मागणी संघटनेने केली. यावर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष उत्तम अहिरे, उपाध्यक्ष अशोक पाटील, डॉ. योगेश सदगीर, महासचिव वैशाली पाटील यांचा समावेश होता.

...........

Web Title: Appoint a yoga teacher at the police headquarters