रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST2021-07-09T04:19:22+5:302021-07-09T04:19:22+5:30

गोंदिया : येथील रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत असून वाहनचालकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वेस्थानक ...

Appoint traffic police in railway station area () | रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करा ()

रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करा ()

गोंदिया : येथील रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत असून वाहनचालकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक पोलीस चौकीत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीने वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना निवेदनातून केली आहे.

येथील रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक पोलीस चौकीच्या निर्मितीला अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र,अद्याप येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. परिणामी, नागरिकांना ये-जा करण्यास अडचण होते. येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास ही अडचण दूर होवू शकते. त्यामुळे येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सलाहकार समितीने वाहतूक पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांना निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात सूरज नशिने, दिव्या भगत, लक्ष्मण लधानी, हरिश अग्रवाल, अखिल नायक आदी उपस्थित होते.

Web Title: Appoint traffic police in railway station area ()