शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

३५० शेतकऱ्यांचे विमा कंपनीकडे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 6:00 AM

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : संयुक्त सर्वेक्षणाला सुरूवात : गाव निहाय याद्या तयार करणे सुरू : मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील ७० हजारावर शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला होता. जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीचा पावसाचा फटका धान पिकांना बसला. त्यामुळे जिल्ह्यातील ३५० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्या कुठल्या निकषाच्या आधारावर नुकसान भरपाई देते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते. हलका धान दिवाळीपूर्वीच निसविल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली होती. त्यामुळे कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून होता. मात्र मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला. तर दोन दिवस पाऊस झाल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्या. परिणामी दोन तीन दिवस बांध्यामध्ये पाणी साचून राहिल्याने काही धानाला अंकुर फुटले तर मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला. जवळपास ३ हजार हेक्टरमधील पिके अवकाळी पावसामुळे प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शासनाच्या निर्देशानंतर कृषी, महसूल आणि विमा कंपन्यांनी संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे तयार करण्यास सुरूवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनीकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच विमा कंपनी नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देते. त्यामुळे आत्तापर्यंत नुकसान झालेल्या ३५० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केले आहे.विमा कंपनीने प्रत्येक तालुकास्तरावर एका प्रतिनिधीची नियुक्ती केली असून जिल्हास्तरावर समन्वयकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पीक विमाधारक शेतकºयांनी अर्ज करणे आवश्यक आहे.अन्यथा त्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.नुकसान भरपाईसाठी ३३ टक्केची अटपीक विमा कंपनी आणि शासनाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. त्याच शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे हेच शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरणार आहेत.कृषी व महसूल विभाग लागला कामालाअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन गाव निहाय याद्या तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. या अंतर्गत कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केला जात आहे. ही प्रक्रिया पुन्हा किमान आठ दिवस चालणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.शेतकऱ्यांसाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावलेजिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मागणी लावून धरल्याचे चित्र आहे.पाखड धान ११०० रुपये प्रतिक्विंटलकापणी केलेले धान मोठ्या प्रमाणात भिजल्याने ते पाखड झाले. शेतकरी हे धान बाजारपेठेत विक्रीस नेत असून व्यापारी त्याची पडत्या दराने खरेदी करीत आहे. सध्या पाखड झालेला धान ११०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपयांचा फटका बसत आहे.धान खरेदी केंद्राचे भिजत घोंगडे कायमदिवाळी लोटत असली तरी अद्याप जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. शासकीय धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याबाबत अद्यापही अनिश्चितेचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा