शेतकरी सेवा समितीचे एसडीओंना निवेदन

By Admin | Updated: February 27, 2017 00:20 IST2017-02-27T00:20:36+5:302017-02-27T00:20:36+5:30

शेतकरी सेवा समिती तिरोडा तालुकाच्या वतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी वर्गाच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी

Appeal to the SDM of the Farmer's Service Committee | शेतकरी सेवा समितीचे एसडीओंना निवेदन

शेतकरी सेवा समितीचे एसडीओंना निवेदन

विविध मागण्या : वीजदरात सवलत आणि वन्यप्राण्यांपासून रक्षण करा
तिरोडा : शेतकरी सेवा समिती तिरोडा तालुकाच्या वतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी वर्गाच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व शेती उपयोगी यंत्र शासनाकडून मोफत सवलतीवर देणे, शेतकरीला बारमाही सिंचन व्यवस्था करणे, ५० टक्के कृषी पंपावर विद्युत दरात सवलत, वन्यप्राण्यामुळे शेतीचे पीक नुकसानभरपाई त्वरीत देणे, उपाय योजना करणे, शेतकऱ्यांना पेंशन व मासीक वेतन देणे, धानाला किमान २५०० रुपये ते ४ हजार भाव देणे, शेतकऱ्यांची कर्जाची वसुली थांबवून कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, लोडशेंडीग बंद करणे, शेतकऱ्यांना कुपनासाठी सरसकट अनुदान देणे, शेतकऱ्यांना खनिज, रेती, वाळू, माती, विटा यावरील निर्बंध हटविणे अशाप्रकारचे मागणीचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्याला देण्यात आले.
यावेळी नरेंद्र रहांगडाले, राजू ठाकरे, विलास मेश्राम, रफीक शेख, महेश बालकोठे, सहेसराम पटले, भरत रहांगडाले, डॉ. मिलींद पटले, हितेंद्र जांभुळकर, अनिल रहांगडाले, सुरेश पटले, शाहील मालाधारी, इस्तारू नखाते, सुभाष अंबुले, खुशाल कडव, गंगाराम शेंडे, लोकचंद कडव, दिनेश जमईवार, भाऊराम गोंदुळे, प्रदीप पटले अन्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Appeal to the SDM of the Farmer's Service Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.