ओबीसी संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By Admin | Updated: September 10, 2016 00:23 IST2016-09-10T00:23:38+5:302016-09-10T00:23:38+5:30
जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व शास्त्री वॉर्ड ओबीसी कृती संघर्ष समितीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेचा निषेध नोंदविणारे ...

ओबीसी संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
विविध मागण्यांचा समावेश : ओबीसींना खोट्या गुन्ह्यात अडकवितात
गोंदिया : जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व शास्त्री वॉर्ड ओबीसी कृती संघर्ष समितीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेचा निषेध नोंदविणारे निवेदन मु्ख्यमंत्र्याचे नावे उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात आले. नायब तहसीलदार वाहने यांनी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळसोबत चर्चा करु न निवेदन लगेच मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करून पीडित कुटुबांना न्याय व सुरक्षा देण्यात यावे, पुरोगामी महाराष्ट्रात कोपर्डी सारख्यÞा घटना काळीमा फासणाऱ्या असल्याने या प्रकरणात आरोपी कुणीही असो त्यास कुठल्याच प्रकारचे सरंक्षण न देता अशा घटनांवर आळा घालण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ओबीसी समाजात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ओबीसी समाजातील व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सोबतच गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघटक राजेश नागरीकर यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावे. भाजप ओबीसी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.मुकेश रहागंडाले यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावे आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कार्याध्यÞक्ष अमर वराडे,सयोंजक खेमेंद्र कटरे,संघटक कैलास भेलावे,शास्त्री वार्ड अध्यक्ष खुशाल कटरे, कार्याध्यक्ष प्रा. रामलाल गहाणे, भारत पाटील, प्रमेलाल गायधने, आर.के. कारंजेकर, बंशीधर शहारे, शिशिर कटरे, रामकृष्म गौतम, डॉ. संजीव रहागंडाले, राजेश कापरे, ओमप्रकाश सपाटे, महेंद्र बिसेन, संजय राऊत व इतर पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)