आणखी १५३ पाणी पुरवठा योजना

By Admin | Updated: December 7, 2015 05:48 IST2015-12-07T05:48:53+5:302015-12-07T05:48:53+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा

Another 153 water supply scheme | आणखी १५३ पाणी पुरवठा योजना

आणखी १५३ पाणी पुरवठा योजना

कपिल केकत ल्ल गोंदिया
जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सातत्याने पाणी पुरवठा योजना तयार केल्या जात आहेत. यात आता अधिकची भर घालत जिल्ह्यासाठी आणखी १५३ योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या आहेत. प्रस्तावित केलेल्या या योजनांची यादी विभागाकडून स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आली आहे.
पाणी जीवनाश्यक वस्तू असतानाच सर्वांना पाणी ही शासनाची मूलभूत जबाबदारी व सर्वांचा अधिकार आहे. मात्र उन्हाळ्यात जिल्ह्यातील कित्येक गावांत पाणी पेटते. पाण्याअभावी गावकऱ्यांना इतरत्र भटकावे लागत असल्याचेही प्रकार जिल्ह्यात घडतात. याचे कारण आजही कित्येक गावांत नळ योजना नाही, तर काही गावांत वाढलेल्या लोकसंख्येमुळे असलेली योजना पुरेपूर पाणी पुरवठा करू शकत नाही.
या सर्व प्रकारांवर जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभाग नजर ठेवून आहे. यातूनच पाणी टंचाई या प्रकारावर आळा घालण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सन २०१४-१५ मध्ये मार्चपर्यंत १०४ योजना तयार केल्या. मात्र यानंतरही कित्येक गावांत नळ योजना नसल्याने किंवा वाढीव योजना देण्याची गरज आहे. परिणामी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून यंदा १५३ योजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये सर्वाधिक योजना अर्जुनी-मोरगाव तालुक्याला देण्यात आल्या असून या योजनांची यादी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आली आहे.
या योजनांना मंजूरी मिळाल्यास जिल्ह्यातील बहुतांश गावांना त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना लाभणार आहे. परिणामी उन्हाळ्यात जिल्ह्यात पेटणारी पाणी टंचाईची समस्या आटोक्यात येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याचा लाभ असा होणार की, पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागणार नाही व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रयत्न खऱ्या अर्थाने फळाला येणार.

अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सर्वाधिक योजना
४ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या १५३ योजनांमध्ये सर्वाधिक योजना अर्जुनी-मोरगाव तालुक्याला देण्यात आल्या आहेत. २८ योजना यंदा अर्जुनी-मोरगावला देण्यात आल्या असून सर्वात कमी आठ योजना आमगावसाठी आहेत. यावरून अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनांची गरज जास्त असल्याचे म्हणता येईल.

प्रस्तावित केलेल्या योजनांचा तक्ता
तालुकासंख्या
आमगाव८
अर्जुनी-मोरगाव२८
देवरी १३
गोंदिया२६
गोरेगाव१६
सडक-अर्जुनी २४
सालेकसा११
तिरोडा२७
एकूण१५३

Web Title: Another 153 water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.