नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

By Admin | Updated: August 21, 2015 02:13 IST2015-08-21T02:13:17+5:302015-08-21T02:13:17+5:30

देवरीच्या नगर पंचायत निवडणुकीकरिता प्रभाग रचना व जातीनिहाय आरक्षण सोडत गुरूवारी देवरी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी ...

Announcing the reservation of the Nagar Panchayats | नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

देवरी : देवरीच्या नगर पंचायत निवडणुकीकरिता प्रभाग रचना व जातीनिहाय आरक्षण सोडत गुरूवारी देवरी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी व तहसीलदार संजय नागटीळक यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांसमोर काढण्यात आली.
नगर पंचायतच्या १७ जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीत नामाप्रकरीता ५, सर्वसाधारण करिता ७, अनुसूचित जातीकरिता ३ व अनुसूचित जमातीसाठी ३ जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामध्ये प्रभाग १ मध्ये नामाप्र (खुला प्रवर्ग), प्रभाग २- नामाप्र (खुला), प्रभाग ३-सर्वसाधारण, प्रभाग ४- अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग ५- नामाप्र (महिला), प्रभाग ६ नामाप्र (महिला), प्रभाग ७-सर्वसाधारण (महिला), प्रभाग ८-सर्वसाधारण (महिला), प्रभाग ९ सर्वसाधारण, प्रभाग १०- अनुसूचित जाती (खुला), प्रभाग ११- नामाप्र (महिला). प्रभाग १२- अनुसूचित जमाती (खुला), प्रभाग १३-अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १४- अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १५-सर्वसाधारण, प्रभाग १६- सर्वसाधारण, प्रभाग १७- अनुसूचित जमाती (महिला) असे आरक्षण जाहीर झाले.
सडक-अर्जुनी
सडक-अर्जुनी : नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासकाच्या हातात नगर पंचायतचा कारभार सोपविण्यात आला होता. गुरूवारी आरक्षण सोडत निघाल्यानंतर नगर पंचायतच्या निवडणुका कधी होणार, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले होते.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या १७ वॉर्डकरिता आरक्षण काढण्यात आले. वार्ड ६- एसटी, वार्ड १२- एसटी पुरूष, वार्ड १ व ७ एस.सी. महिला, वार्ड १७- एस.सी.जनरल, वार्ड २, ४, आणि १६ हे ओबीसी, नमाप्र महिला, वॉर्ड ८- नामाप्र पुरूष, वार्ड ५ - ना.म.प्र. सर्वसाधारण, तर सर्वसाधारण जागेकरिता वार्ड ३, ९, आणि १३ तर सर्वसाधारण महिला वार्ड १०, ११, आणि वॉर्ड १४, तसेच वार्ड १५- सर्वसाधारण पुरूष याकरिता राखीव झाले आहेत.
आरक्षण काढताना निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसीलदार व्ही.एम.परळीकर, ना.तहसीलदार व्ही.आर. अटराहे आणि गावकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)

Web Title: Announcing the reservation of the Nagar Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.