शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

आठ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: February 12, 2015 01:19 IST

३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार असून ...

गोंदिया : ३१ आॅक्टोबर २०१४ पुर्वी संचालक मंडळांचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांची निवडणूक घेतली जाणार असून या आठही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सभासदांत मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे मात्र थकबाकीदारांचे निवडणूक लढण्याचे व मतदानाचे अधिकार हिरावणार असल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणद्वारे ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणुक राहणार आहे. १९९७ च्या घटना दुरूस्तीनुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार आता सहकारी संस्थांच्या निवडणुका प्राधीकरणच्या माध्यमातूनच घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील त्यांची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. प्राधीकरणने यासाठी काही नियम तयार केले असून संस्थांची अ, ब, क व ड या चार प्रकारात विभागणी केली आहे. जिल्हा उप निबंधक कार्यलयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणच्या आदेशानुसार ३१ आॅक्टोबर २०१४ पूर्वी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील आठ निवडणुकीस पात्र ठरत असून त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्यात घेण्यात येणार आहेत. त्यानुसार या आठही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)थकबाकीदारांत धाकधूक संस्थांच्या निवडणुकीला घेऊन आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. मात्र वरील संस्थांमधील ज्या सभासदांकडे संस्थेची थकबाकी असेल त्यांना निवडणुकीत उभे राहण्याचा तसेच मतदानाचाही अधिकारी राहणार नाही. ९७ व्या घटना दुरूस्तीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेची थकबाकी असलेल्या सभासदांना निवडणुक लढण्याची असल्यास किंवा मतदानाचा अधिकार कायम ठेवण्यासाठी संस्थेची थकबाकी भरावी लागणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धडकी वाढली आहे. निवडणुकीस पात्र आठ संस्थांमधील गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी संस्था ही मोठी संस्था आहे. यात ११ फेब्रुवारी रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. २५ फेब्रुवारी पर्यंत त्यावर आक्षेप व हरकती सादर करावयाच्या आहेत. ३ मार्च रोजी आक्षेप व हरकतींवर सुनावनी देऊन निकाली काढणे तर १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच अन्य सात संस्था लहान संस्था असून त्यांत १० फेब्रुवारी रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे, २४ फेब्रुवारी पर्यंत त्यावर आक्षेप व हरकती सादर करणे, २ मार्च रोजी आक्षेप व हरकतींवर सुनावनी देऊन निकाली काढणे तर ११ मार्च रोजी अंतिम मतदार तयार करणे असा कार्यक्रम आहे.