घरकूल योजनेतील प्रपत्र ‘ड’ची यादी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:25+5:302021-06-11T04:20:25+5:30

शासनाच्या वतीने नागरिकांसाठी अनेक योजना चालविण्यात येत आहेत. यात एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे घरकूल योजना आहे. या योजनेंतर्गत वडेगाव, ...

Announce the list of Form ‘D’ in Gharkool scheme | घरकूल योजनेतील प्रपत्र ‘ड’ची यादी जाहीर करा

घरकूल योजनेतील प्रपत्र ‘ड’ची यादी जाहीर करा

Next

शासनाच्या वतीने नागरिकांसाठी अनेक योजना चालविण्यात येत आहेत. यात एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे घरकूल योजना आहे. या योजनेंतर्गत वडेगाव, मुंडीकोटा, सुकडी-डाकराम, इंदोरा बु. व अर्जुनी परिसरात प्रपत्र ‘ब’ची यादी मंजूर करण्यात आली असून, घरकुलांचे कामही सुरू आहे. मात्र, प्रपत्र ‘ड’ची यादी जाहीर करण्यात आली नसल्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्यात येणार आहे. मात्र, प्रपत्र ‘ड’ची यादी जाहीर करण्यात आली नसल्यामुळे लाभार्थींचे घरकूल योजनेचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रपत्र ‘ड’ची यादी त्वरित जाहीर करून लाभार्थींना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Announce the list of Form ‘D’ in Gharkool scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.