गोंदिया : मागील वर्षी २७ मार्च रोजी गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता.मात्र मे महिन्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढीला सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने सुध्दा कडक उपाययोजना करीत पूर्णपणे लॉकडाऊन केला होता. बाधित रुग्ण आढळलेला परिसर सुध्दा २८ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला होता. याला शनिवारी (दि.२७) रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झाला. मागील वर्षीचा याच तारखेचा अनुभव आठवण येताच सर्वांच्या अंगावर शहारे येतात. तसेच पुन्हा नको ते दिवस असेच वाक्य प्रत्येकाच्या मुखात येते. मागील वर्षी मार्च महिन्यात १ असलेली रुग्ण संख्या यावर्षी मार्च महिन्यात तब्बल १५५६०० वर पोहचली आहे. तर तब्बल १८७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर वर्षभरानंतरही कोरोनाचा ग्राफ वाढताच असल्याने जिल्हावासीयांवरील संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणेच नागरिकांच्या हाती असून त्याचे त्यांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करावा.
.......
औषधाचा पुरेसा साठा
जिल्ह्यात मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीला आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. औषधांचा काहीसा तुडवडा निर्माण झाला होता. मात्र सध्या स्थितीत आरोग्य विभागाकडे कोरोना उपचाराच्या दृष्टीने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. औषधांचा कुठलाही तुटवडा नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
............
कोविड सेंटर पुरेस आहेत का
- मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा तीन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. सध्या स्थितीत कोविड केअर सेंटरची संख्या पुरेशी आहे.
- कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खासगी रुग्णालयात सुध्दा बेड्स राखीव ठेवण्याच्या आरोग्य विभागाने केल्या आहे.
- ऑक्सिजन व व्हेंटीलेटर युक्त जवळपास ३६२ बेड्स उपलब्ध असून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी केली जात आहे.
....
पहिला पॅझिटिव्ह सध्या काय करतोय
-गोंदिया शहरात गणेशनगर परिसरात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. हा रुग्ण युवक असून कोरोनाची लागण झाल्यानंतर तो जवळपास महिनाभर विलगीकरणात होता. त्यानंतर त्याच्या तीन चाचण्या करण्यात आल्या. त्यात तो कोरोनामुक्त झाला होता.
- सध्या हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण एकदम तंदूरुस्त असून तो आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहे. आपल्या वडिलांच्या व्यवसायात तो सहकार्य करीत आहे.
- मी जिल्ह्यातील पहिलाच रुग्ण असल्याने मला त्यावेळेस आलेले अनुभव फार कटू होते. पण कुटुंबीय आणि मित्रांनी धीर आणि हिमतीमुळे यातून सुखरुपपणे मुक्त झालो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी.
.................
असे वाढले रुग्ण
मार्च २०२० - ०१
एप्रिल - ००
मे - ६६
जून - ६२
जुलै - १८४
ऑगस्ट - १२५१
सप्टेंबर- ५६९३
ऑक्टोबर- २६९९
नोव्हेंबर -२६६७
डिसेंबर -१२८८
जानेवारी २०२१- ४६९
फेब्रुवारी - २४२
मार्च : १२२०
.............
२७ एप्रिल २०२१ रोजी आढळला पहिला रुग्ण
कोरोनाचे एकूण रुग्ण :
बरे झालेले एकूण रुग्ण :
एकूण कोरोना बळी :
सध्या उपचार सुरु असलेले :
कोविड केअर सेंटर्सची संख्या :
..................