पशुखाद्याचे दर वाढले; पशुपालक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:20+5:302021-03-06T04:28:20+5:30
कचराकुंड्यांना सुटली दुर्गंधी, नागरिक त्रस्त गोरेगाव : शहरात ठिकठिकाणी असलेल्या कचराकुंड्यांना दुर्गंधी सुटल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत ...

पशुखाद्याचे दर वाढले; पशुपालक चिंतेत
कचराकुंड्यांना सुटली दुर्गंधी, नागरिक त्रस्त
गोरेगाव : शहरात ठिकठिकाणी असलेल्या कचराकुंड्यांना दुर्गंधी सुटल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत कचराकुंड्या उभारल्या आहेत.
गौण खनिज चोरीकडे दुर्लक्ष!
सडक-अर्जुनी : महसूल आणि वन विभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे; परंतु महसूल विभाग केवळ रेती तस्करांच्या मागावर असतात. त्यामुळे मुरुम, दगड चोरट्यांना रान मोकळे असल्याचे दिसून येत आहे.
नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी
अर्जुनी-मोरगाव : सांडपाण्याचा निचरा होत नाही; पण अजूनही नगरपंचायत प्रशासनाचे नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या केरकचऱ्याने भरल्या आहेत. त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नाही. नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी आहे. नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
गोंदिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
तिरोडा : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. हिवतापासारख्या आजाराची शक्यता आहे.
फाइव्ह-जीकडे वाटचाल; मात्र सेवा ‘थ्री जी’तच!
गोंदिया : अँड्रॉइड मोबाइल हा सध्याच्या काळात जीवनावश्यक घटक बनला असून, मोबाइलशिवाय व्यक्ती जगणे कठीणच झाले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता पुढे मोबाइलचे स्पीड अधिक होणार, अधिक सुविधा मिळणार, म्हणजे मोबाइल कंपन्यांची ‘फाइव्ह-जी’कडे वाटचाल सुरू असून, ही सेवा लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत; मात्र सध्या थ्री-जी, फोर-जीचे स्पीड व्यवस्थित मिळत नाही.
शेतशिवारात माकडांच्या उच्छादात वाढ
सालेकसा : शेतशिवार मोकळे झाले आहे. याचा फायदा आता माकडांना होत असून, भाजीपाला पिकांमध्ये माकडांचा उच्छाद सुरू आहे. शेतकरी माकडांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
आमगाव : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे; मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
जिल्ह्यात कृषीपंप चोरटे सक्रिय
बोंडगावदेवी : सिंचनासाठी विहीर, नदीनाल्यांवर लावलेले कृषीपंप चोरीस जाण्याच्या घटनांत जिल्ह्यात वाढ झाली आहे. दररोज चोरीची घटना घडत असून, एखादी टोळी सक्रिय असावी, असे वाटते.
नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले; मात्र पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या, त्या बुजविण्यात आल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.