पशु दवाखाना वाऱ्यावर
By Admin | Updated: November 17, 2014 22:57 IST2014-11-17T22:57:58+5:302014-11-17T22:57:58+5:30
तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पण मागील १५ वर्षांपासून तेथे डॉक्टर नाहीत. त्यामुळे हा दवाखाना वाऱ्यावर दिसत असून शोभेची वास्तु ठरत आहे.

पशु दवाखाना वाऱ्यावर
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पण मागील १५ वर्षांपासून तेथे डॉक्टर नाहीत. त्यामुळे हा दवाखाना वाऱ्यावर दिसत असून शोभेची वास्तु ठरत आहे.
या दवाखान्यात नवेझरी परिसरातील १० ते १५ गावांचा समावेश होतो. नवेझरी हे गाव केंद्राचे ठिकाण असून या गावी शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या परिसरात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे शेती करणे, गुरेढोरे पाळणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे जनावरे आजारी पडल्यास येथील शेतकऱ्यांची पंचाईत होते.
येथे डॉक्टर नसल्यामुळे त्यांना बाहेर गावी जाऊन खाजगी डॉक्टरांकडून औषधोपचारावर पैसा खर्च करावा लागतो. पण यावेळी जनावरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली असून शेतकऱ्यांना जनावरे घेण्यास कठीण समस्या निर्माण झाली आहे. अशात डॉक्टर अभावी अनेकांची जनावरे दगावली आहेत.
येथील शेतकऱ्यांनी अनेकदा शासनाकडे लेखी तक्रार करून येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था कळविली. मात्र त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुले तक्रार धुळखात पडून असल्याचे दिसते. तरी नवेझरी येथील पशुवैद्यकीय दवाखन्यात डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र भांडारकर यांनी केली आहे. (वार्ताहर)