साळ्याच्या लग्नात नाराज जावयाकडून मारहाण
By Admin | Updated: February 19, 2017 00:03 IST2017-02-19T00:03:41+5:302017-02-19T00:03:41+5:30
साळ्याच्या लग्नासाठी सासूरवाडीला गेलेल्या जावयाचा लग्नातच पत्नीशी वाद झाला. यामुळे तेथून घरी परतलेल्या त्या जावईबापूने पत्नी घरी येताच

साळ्याच्या लग्नात नाराज जावयाकडून मारहाण
गोंदिया : साळ्याच्या लग्नासाठी सासूरवाडीला गेलेल्या जावयाचा लग्नातच पत्नीशी वाद झाला. यामुळे तेथून घरी परतलेल्या त्या जावईबापूने पत्नी घरी येताच तिला जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. राजू मुका मेंढे (४५) रा.खमारी असे आरोपीचे नाव आहे. रेशमा राजू मेंढे (४०) रा.खमारी असे जखमी महिलेचे नाव आहे.
साळ्याचे लग्न असल्याने दोघेही लग्नाला गेले. परंतु तेथे पती-पत्नीचा वाद झाल्याने राजू घरी परतला होता. भावाचे लग्न आटोपून रेशमा घरी आल्यावर तुला ठेवत नाही, तू आपल्या वडीलांकडे जा, असे बोलून तिच्याशी वाद घातला. तिला काठीने मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या आईलाही मारहाण केली. तक्रारीवरुन गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.