बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी

By Admin | Updated: March 21, 2015 01:57 IST2015-03-21T01:57:21+5:302015-03-21T01:57:21+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी महत्वाचे घटक ठरलेल्या बुथ लेवल आॅफिसरची (बीएलओ) जबाबदारी शिक्षकांनी इमाने इतबारे पार पाडली.

Angry at the teachers working in the BLO | बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी

बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी

गोरेगाव : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी महत्वाचे घटक ठरलेल्या बुथ लेवल आॅफिसरची (बीएलओ) जबाबदारी शिक्षकांनी इमाने इतबारे पार पाडली. पण त्याचा मोबदलाच दिला नसल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातूनच पुढील काम करायची की नाही, असे विचारमंथन त्यांच्यात सुरू आहे.
आता शिक्षकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार याद्या तयार करणे, मतदारांना चिठ्या घरपोच देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या कामासाठी मात्र त्यांना मोबदला दिला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्वरीत शिक्षकांना त्यांनी केलेल्या निवडणुकीतील कामांना मोबादला देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका संयोजक शंकर चव्हाण यांनी केली आहे.
निवडणुकीत शिक्षकांना निवडणुकीचे विविध काम सोपविले जाते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. सदर बाब गंभीर स्वरुपाची असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
आजघडीला शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना शिकविण्याव्यतिरिक्त बरीच कामे करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे, कायमचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांना फक्त शैक्षणिक कार्यातच कार्यरत ठेवावे. असे केल्यास शैक्षणिक दर्जा उंचावेल.

Web Title: Angry at the teachers working in the BLO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.