अन् नेत्ररोगतज्ज्ञ रुग्णांना सोडून पळाला

By Admin | Updated: November 15, 2014 22:48 IST2014-11-15T22:48:47+5:302014-11-15T22:48:47+5:30

सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र रुग्णांची तपासणी करण्यासाठी गेलेला नेत्ररोग तज्ज्ञ धुंदीत असल्याने रुग्णांनी गोंधळ घातला. परिणामी तो नेत्ररोग तज्ज्ञ नागरिकांचा गोंधळ पाहून रुग्णांना

And ophthalmologists leave the patients | अन् नेत्ररोगतज्ज्ञ रुग्णांना सोडून पळाला

अन् नेत्ररोगतज्ज्ञ रुग्णांना सोडून पळाला

गोंदिया : सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र रुग्णांची तपासणी करण्यासाठी गेलेला नेत्ररोग तज्ज्ञ धुंदीत असल्याने रुग्णांनी गोंधळ घातला. परिणामी तो नेत्ररोग तज्ज्ञ नागरिकांचा गोंधळ पाहून रुग्णांना सोडून पळाला. ही घटना शुक्रवारच्या दुपारी घडली. ए.आर. जांगळे असे त्या नेत्ररोग तज्ज्ञाचे नाव आहे.
सालेकसाच्या ग्रामीण रुग्णालयात नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून ए.आर. जांगळे हे मागील पाच वर्षापासून कार्यरत आहेत. सालेकसा तालुक्यातील सातगाव, बिजेपार, दरेकसा व कावराबांध या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातील एक शुक्रवार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा द्यायची हे ठरले आहे. या संदर्भात ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील डॉ. सुषमा नितनवरे व तालुका वैद्यकीय अधिकारी विवेक अनंतवार यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे आदेश जांगळे यांना देण्यात आले. शुक्रवारी (दि.१४) जांगळे यांना सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा द्यायची होती. या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र रोगाचे ६० ते ७० रुग्ण असताना जांगळे सकाळी १० वाजता तेथे आले. ते मद्याच्या धुंदीत असल्याचा संशय अनेक रुग्णांना वाटल्याने ते आपला उपचार कसा करतील, असे म्हणून रुग्णांनी गोंधळ घातला.

Web Title: And ophthalmologists leave the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.