...आणि चक्क बस लागली जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST2021-03-04T04:54:59+5:302021-03-04T04:54:59+5:30
अर्जुनी - मोरगाव : बसमधील प्रवासी महिलेच्या गळ्यातील हार चोरीला गेल्याचा प्रकार घडल्यानंतर ठाणेदारांनी बस जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात ...

...आणि चक्क बस लागली जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात
अर्जुनी - मोरगाव : बसमधील प्रवासी महिलेच्या गळ्यातील हार चोरीला गेल्याचा प्रकार घडल्यानंतर ठाणेदारांनी बस जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात लावून बसमधील प्रवाशांची तपासणी केली. मंगळवारी (दि. २) सायंकाळी ४.३० वाजण्याच सुमारास ही घटना घडली आहे.
येथील बसस्थानकावर गोंदिया आगाराच्या बसमध्ये तालुक्यातील ग्राम दाबना येथील मालता भिवा प्रधान (३५) गोंगले - पांढरी येथे जाण्यासाठी बसच्या दरवाजात चढण्याच्या तयारीत असताना गर्दीतून एकाने त्यांच्या गळ्यातील अडीच ग्राम वजनाचे पदक व चार ग्रॅम मणी असलेला हार पळविला. या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी - मोरगावचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी ही बस जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात लावून बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली. बातमी लिहीपर्यंत तपासणी सुरू होती.