शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

तृष्णा तृप्तीच्या सेवा कार्याची नाबाद पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:33 IST

उन्हाळा लागताच पूर्वी बसस्थानक व शहरातील मुख्य चौकात स्वंयसेवी संस्था पाणपोई सुरू करीत होते. मात्र अलीकडे हे चित्र दिसेनासे झाले आहे. समाजात माणुसकीचा झरा आटत असताना मात्र हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील पन्नास वर्षांपासून मटका कोला च्या माध्यमातून प्रवाशांची तृष्णा तृप्ती करण्याचे काम एका समितीमार्फत सुरू आहे.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकावरील प्रवाशांना मदत : तहानलेल्यांसाठी मटका कोला, नगर नागरिक सेवा समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा लागताच पूर्वी बसस्थानक व शहरातील मुख्य चौकात स्वंयसेवी संस्था पाणपोई सुरू करीत होते. मात्र अलीकडे हे चित्र दिसेनासे झाले आहे. समाजात माणुसकीचा झरा आटत असताना मात्र हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील पन्नास वर्षांपासून मटका कोला च्या माध्यमातून प्रवाशांची तृष्णा तृप्ती करण्याचे काम एका समितीमार्फत सुरू आहे. त्यांच्या या सेवा कार्यात मागील पन्नास वर्षांपासून कधीच खंड पडला नसून त्यांच्या या कार्याला नाबाद पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.धानाचा जिल्हा अशी वेगळी ओळख जपणाऱ्या गोंदिया जिल्ह्याचे आणखी वैशिष्ट आहे. ते म्हणजे मटका कोला (पाणपोई) हे होय. हावडा-मुंबई मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाची ओळख आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावतात. तर २० हजारावर प्रवाशी दररोज ये-जा करतात. उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची बरेचदा गैरसोय होते. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांना रेल्वे स्थानकावर थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी गोंदिया येथील किराणा तेल व्यापारी संघाने श्री रणछोडदासजी महाराज यांच्या प्रेरणेने नगर नागरिक सेवा समितीची १९६४ मध्ये स्थापना केली. त्यानंतर रेल्वे स्थानकावर मटका कोला ही सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी मागीतली. तत्कालीन रेल्वे स्टेशन अधीक्षक के.पी.ननजुंदन यांनी परवानगी देत सहकार्य केले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तृष्णा तृप्ती करण्यासाठी मटका कोला हा उपक्रम सुरू करण्यात आला. रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी येताच प्रत्येक डब्ब्यापर्यंत पोहचून प्रवाशांना थंड पाणी देण्याचे काम हे या समितीचे सदस्य करतात. विशेष म्हणजे मागील पन्नास वर्षांपासून या सेवेत कधीच खंड पडला नाही. त्यामुळेच उन्हाळ्यात तीन महिने रेल्वे स्थानकावर थंड पाणी मिळते.अशा प्रकारची थंड पाण्याची सुविधा मिळणारे हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एकमेव आहे.नगर नागरिक सेवा समितीने सुरू केलेल्या सेवा कार्याला समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मागील पन्नास वर्षांपासून अविरत पुढे नेत आहेत. त्यामुळे या सेवा कार्यात समाजातील अनेक तरुण सुध्दा जुळत आहे. ते देखील दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रेल्वे स्थानकावर पोहचून प्रवाशांना थंड पाणी देण्याची सेवा करतात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाºया प्रवाशांना सुध्दा कुठे पाणी मिळाले नाही तरी गोंदिया रेल्वे स्थानकावर निश्चितच थंड पाणी मिळेल असे सांगतात. ऐवढी या सेवा कार्याची महती झाली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी नगर नागरिक सेवा समितीचे भगीरथ अग्रवाल, रामप्रसाद अग्रवाल, पुरुषोत्तम पलन, हरगुरूदास ठकरानी, सुरेशभाई पलन,लेडूमलजी भोजवानी, कुमारभाई पलन, रामचंद अग्रवाल, सतीश अग्रवाल, जस्सूभाई सोलंकी,घनश्याम पुरोहित, लक्ष्मीचंद रोचवानी यांनी पुढाकार घेतला.मजुरांना रोजगारगोंदिया रेल्वे स्थानकावर उन्हाळ्यात तीन महिने मटका कोला ही थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक रेल्वे गाडीच्या डब्ब्यापर्यंत जावून प्रवाशांना थंड पाणी त्यांच्याकडील बॉटलमध्ये भरुन दिले जाते. यासाठी समितीने २० ते २५ मजुर सुध्दा लावले आहे. यामुळे तीन महिने या मजुरांना सुध्दा रोजगार मिळतो.कामठीवरुन मागविले जातात राजंनरेल्वे प्रवाशांना चौवीस थंड पाण्याची सुविधा देण्यासाठी नगर नागरिक सेवा समितीने नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून दरवर्षी खास मातीचे राजंन मागविते. या राजंनातील पाणी थंड राहत असल्याने प्रवाशांची सुध्दा तृष्णा तृप्ती होत आहे.

टॅग्स :Waterपाणीrailwayरेल्वे