गणवेशाची रक्कम आईच्या खात्यावर

By Admin | Updated: May 4, 2017 00:58 IST2017-05-04T00:58:02+5:302017-05-04T00:58:02+5:30

प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून

The amount of uniforms on the mother's account | गणवेशाची रक्कम आईच्या खात्यावर

गणवेशाची रक्कम आईच्या खात्यावर

 ३ कोटी ९ लाख मंजूर : जिल्ह्यातील ७७ हजार ३८२ विद्यार्थी लाभार्थी
निलकंठ भुते   चिरचाळबांध
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोडी गणवेशाची रक्कम देण्यात येते. यापूर्वी ही रक्कम शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती. परंतु आता ही रक्कम सरळ विद्यार्थ्यांचे नविन खाते आईसोबत संयुक्त पध्दतीने काढले जाणार असून त्या खात्यावर ही रक्कम टाकली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व श्रीमंत गरीब असा भेदभाव नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची योजना शासनाने सुरू केली. शाळेत सर्व विद्यार्थी गणवेशात यावे यासाठी शासनाने वर्षातून दोन गणवेश विद्यार्थ्यांना देण्याची सोय केली. वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थीनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येते. या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी त्या गणवेशाची रक्कम त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळून त्या गणवेशाची खरेदी करायचे. एका गणवेशासाठी २०० रूपये असे दोन गणवेशासाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्याच्या मागे शाळेला मिळत होते. परंतु या गणवेशातही मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्याच्या बातम्या झळकत असल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आली. आता ही रक्कम सार्व शिक्षा अभियानाकडून शाळा समितीलाच देण्यात येणार आहे. परंतु विद्यार्थी व त्याची आई यांचे संयुक्त खाते शुन्य रूपयात उघडलेल्या खात्यावर टाकायची आहे.
यामुळे आत गणवेशाच्या पैश्यात घोळ होणार नाही. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ च्या ४२ हजार ५८५ मुली, अनुसूचित जातीच्या ४ हजार ७७९ मुले, अनुसूचित जमातीचे ६ हजार ६६५ मुले व दारिद्रय रेषेखालील २३ हजार ३५३ मुले असे एकूण ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोडी गणवेश सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी दिले जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी गणवेशातच जाणार आहेत.

३ कोटी ९ लाख मंजूर
सन २०१७-१८ या सत्रातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाने मंजूर केले आहेत. ही रक्कम आल्या बरोबर शाळा समित्यांना पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईतर्फे निधी पाठविण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे समजते.
खात्याची चौकशी करावी
शाळा समितीने विद्यार्थी व आईच्या शुन्य बॅलेंन्सवर असलेल्या खात्यात गणवेशाचा निधी टाकावा असे शासनाने सूचविले. परंतु यात शाळा समित्या विद्यार्थी वि त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यावर पैसे टाकतात किंवा नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे. जे खात्यावर पैसी टाकतील ते विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कमीशन तर घेत नाही ना यावर करडी नजर ठेवणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने याकडे जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

Web Title: The amount of uniforms on the mother's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.