आमगावचे उपडाकघर वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2016 00:27 IST2016-09-29T00:27:52+5:302016-09-29T00:27:52+5:30

आमगाव तालुक्यात एकमेव उप डाकघर आहे. लाखोची लोकसंख्या असलेल्या या डाक कार्यालयात अनेक योजनांमध्ये लोक पैसे गुंतवितात.

Amesuva's farewell to the wind | आमगावचे उपडाकघर वाऱ्यावर

आमगावचे उपडाकघर वाऱ्यावर

पोस्टमास्तरांची दबंगशाही : खाते उघडणे बंद केल्याचा लावला फलक
आमगाव : आमगाव तालुक्यात एकमेव उप डाकघर आहे. लाखोची लोकसंख्या असलेल्या या डाक कार्यालयात अनेक योजनांमध्ये लोक पैसे गुंतवितात. याकरीता अनेक एजेंट मेहनत करून नविन खाते उघडणे, फीक्स डिपाजीट, सुकन्या योजना इत्यादीचे कामे करतात. परंतु आमगाव डाक कार्यालयात पोस्ट मास्तर विजय उके यांच्या दबंगशाहीमुळे पोस्टचा व्यवहार ठप्प पडला आहे. शासनाचे लाखोचे नुकसान होत आहे. या डाक कार्यालयात कोर-बॅकीग सुविधा असून महिन्याकाठी जवळपास एक कोटी रुपयाची देवाण-घेवाण होत असते.
डाक कार्यालयाची वेळ सकाळी ८ ते ४ असून ग्राहक आणि एजेंट सकाळी देवाण-घेवाण करीता पोहचतात. परंतु पोस्ट मास्तर उशीरा येतात. सर्व कामे नेट बॅकींगने होत असून पोस्ट मास्तरांना संगणकाचे ज्ञान नाही. कर्मचाऱ्यांची कमतरता असून फक्त तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. डाक कार्यालयात ग्राहक खाते उघडण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी गेले तर त्यांना पैसे काढण्याची विड्राल फार्म दिल्या जात नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. देवाण-घेवाण संदर्भात पोस्ट मास्तर ग्राहकांशी एजेंटाशी उद्धटपणे बोलतात. एवढेच नव्हे तर पोस्ट मास्तरांनी खाते उघडणे बंद असल्याचे आदेश लावले आहे. एजेंटची कामे कित्येक दिवस प्रलंबित असतात. एजेंट नविन खातेधारकांना खाते उघडायला आणले असता त्यांचे खाते उघडल्यानंतर १ महिन्या पर्यंत पासबुक दिल्या जात नाही. प्रिंटर एक महिन्यापासून बंद पडले आहे. प्रिंटर दुरूस्तीसाठी कुठलीही उपाययोजना केली नाही.
एजेंट आरडीचे पैसे जमा करण्यास गेले असता लिंक फेल असल्याचे कारण सांगून १५-१५ दिवस पैसे जमा केले जात नाही. यामुळे एजेंटचे नुकसान होत आहे.
पोस्ट आॅफीसच्या या व्यवहारामुळे एजेंटचे उपजिवीकेचे साधन ठप्प पडले आहे. तालुक्यातील सर्व एजेंटनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. १५ दिवसात पर्यायी व्यवस्था न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Amesuva's farewell to the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.