आमगाव नगर परिषदेचा ठराव सर्वसंमतीने पारीत
By Admin | Updated: June 20, 2017 00:53 IST2017-06-20T00:53:57+5:302017-06-20T00:53:57+5:30
आमगाव ग्रामपंचायतला नगर परिषद स्थापना व्हावी यासाठी नागरिकांचा लढा सुरु आहे.

आमगाव नगर परिषदेचा ठराव सर्वसंमतीने पारीत
नागरिकांचा लढा : शासनाने त्वरित निर्णय घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव ग्रामपंचायतला नगर परिषद स्थापना व्हावी यासाठी नागरिकांचा लढा सुरु आहे. यात ग्रामविकास विभाग मंत्रालयाने समायोजित ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश करण्यासाठी नवीन ठरावाची मागणी केली. यात आमगाव ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभेत नागरिकांनी नगर परिषद व्हावी यासाठी सर्वसहमतीने ठराव पारित केला.
आमगाव ग्रामपंचायतचा वाढत्या लोकसंख्याबळावर शासनाने नगर परिषद स्थापन करावी, यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. परंतु राज्य शासनाने आमगाव ग्रामपंचायतला २०१५ मध्ये नगर पंचायतचा दर्जा बहाल करुन परिपत्रक काढले. यावर नागरिकांनी नगर पंचायत विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन पूर्वीच्या मागणीप्रमाणे नगर परिषदेचा दर्जा द्यावा, यासाठी रिट याचिका दाखल केली. यात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी नगर पंचायत रद्द करुन नगर परिषद स्थापना करावी यासाठी शासनाने निर्णय घ्यावे, असा निर्णय दिला.
आमगाव नगर परिषदेचा विषय न्यायालयाच्या निर्णयानंतरही शासनाकडे प्रलंबित आहे. तर नगरविकास विभागाने जानेवारी २०१६ मध्ये आमगाव नगर परिषदेत आठ ग्रामपंचायतचा समावेश करण्यासंदर्भात ३२ घोषणा काढली. तसेच ग्रामविकास विभाग मंत्रालयाने समायोजित ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश करण्यासाठी नवीन ठरावाची मागणी केली. यात आमगाव ग्रामपंचायतने नगर परिषद स्थापनेचा ठराव सर्वसंमतीने विशेष ग्रामसभेत पारित केला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी पी.सी. मेश्राम, प्रशासक येळे यांनी सभेत विषय ठेवला. या विषयाला सर्व संमतीने यशवंत मानकर यांनी मंजुरीला सादर केला. याला उत्तम नंदेश्वर यांनी दुजोरा दिला.