शहरातील प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST2021-04-08T04:29:41+5:302021-04-08T04:29:41+5:30
तालुक्यातील अनेक नागरिकांची व्यापारावरच उपजीविका चालते. यात माच॔ एंडिंगच्या घर कर, विद्युत बिल, बँक वसुली, व्यापाराचे देणे, किराया ...

शहरातील प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी द्या ()
तालुक्यातील अनेक नागरिकांची व्यापारावरच उपजीविका चालते. यात माच॔ एंडिंगच्या घर कर, विद्युत बिल, बँक वसुली, व्यापाराचे देणे, किराया हे सारे देणे झाल्यावर प्रशासनाने पूर्वसूचना न देता लाॅकडाऊन केल्याने सर्वसामान्य व्यापारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अत्यावश्यक सेवेचे दुकाने सुरू आहेत. मात्र, इतर दुकाने बंद असल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांनी तहसीलदार गोरेगाव यांना निवेदन देऊन सर्व दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदनातून कोरोना नियमांचे पालन करून व्ययसाय सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही तर सर्व प्रतिष्ठाने सुरू करणार व काही कमी जास्त झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी रेखलाल टेभंरे, मुन्ना लिल्हारे, प्रमोद जैन, टिटू जैन, हिरालाल रहांगडाले, संजय बारेवार, योगेश ठाकरे, विकास साखरे, गुड्डू कटरे, प्रदीप बरईकर, संतोष रहांगडाले, अनुराग जैन, प्रदीप जैन, अशोक श्रीपात्रे, राजधर रामटेके, देवीदास धप्पाडे, वामन वरवाडे यांचा समावेश आहे.