पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:58 IST2018-03-14T00:58:13+5:302018-03-14T00:58:13+5:30
चौदाव्या वित्त आयोगांतर्गत अपंग कल्याण निधीमधून सडक-अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते....

पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वाटप
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : चौदाव्या वित्त आयोगांतर्गत अपंग कल्याण निधीमधून सडक-अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, समाज कल्याण समितीसभापती विश्वजीत डोंगरे, पं.स. सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, प्रहार संघटनेचे प्रमोद गजभिये यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी योगराज बावनकुळे, प्रेमलाल मानकर, संजय मोहुर्ले, हरिश्चंद्र शेंडे, कौशल्या कवाडकर, दिपाली येरपुडे, गोपाल मानकर, प्रकाश बोरकर, दुर्योधन रहांगडाले, प्रमोद कोल्हे, नरेंद्र अंबुले, तुलसीदास दौलत, देवचंद सिंदीमेश्राम, धनराज शेंडे आदी दिव्यांग बांधवांना सिलींग फॅन, मोबाईल, कपडे व टेबल फॅनचे वितरण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतला दिव्यांगांसाठी असलेल्या ३ टक्के निधीतून सदर साहित्य खरेदी करून वितरित करण्यात आले. प्रास्ताविक भीमराव मानकर यांनी मांडले.
संचालन मधुकर मोहुर्ले यांनी केले. या वेळी म्हसवानी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.