ग्रा.पं.ने केले खासगी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप
By Admin | Updated: September 20, 2015 02:19 IST2015-09-20T02:19:53+5:302015-09-20T02:19:53+5:30
ग्रामपंचायत घाटकुरोडा येथील सचिव, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी खासगी जागेत ग्रामपंचायतच्या ...

ग्रा.पं.ने केले खासगी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप
कारवाईचे आदेश : काम बंद ठेवण्याचे खंडविकास अधिकारी यांचे निर्देश
तिरोडा : ग्रामपंचायत घाटकुरोडा येथील सचिव, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी खासगी जागेत ग्रामपंचायतच्या सुरक्षा भिंतीसाठी अतिक्रमण केल्याचा आरोप शिवशंकर टिकाराम भोंगाडे (६७) यांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे केला. त्यावर खंड विकास अधिकारी यांनी चौकशी करुन काम त्वरित बंद करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.
प्राप्त जानकारीनुसार घाटकुरोडा येथे ग्रामपंचायतचे सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू आहे. ती जागा शिवशंकर टिकाराम भोंगाडे यांची असल्याने त्यांनी त्याबाबत तक्रार अर्ज खंड विकास अधिकारी तिरोडा यांना केली. त्यावर खंड विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष जावून चौकश्ी केली व व्हीजीटबूकमध्ये नोंद केली की ग्रामपंचायतमध्ये चौकशी केली असता सदर जागेचा सातबारा किंवा मालकीचे अधिकृत दस्ताऐवज उपलब्ध मिळाले नाही.
ग्रा.पं.ची प्रशासकीय व काम सुरू करण्याचे ठराव संमत केला नाही. तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन न घेता काम सुरू केले. सदर कामाचे वाद निर्माण झाल्यामुळे अधिकृत दस्ताऐवज प्राप्त करण्यात यावे व नंतरच काम सुरू करावे. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, असे १० सप्टेंबरला नोंदविण्यात आले.
त्यानंतर १५ सप्टेंबर २०१५ ला गटविकास अधिकारी यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना पत्र क्र. पंसति/विअपं/पंचा/१७४७/२०१५ कार्यालय पंचायत समिती तिरोडा १५ सप्टेंबर १५ नुसार नियमाप्रमाणे कारवाई अवलंबून काम करावे अन्यथा सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे पत्र दिले.
ग्राम पंचायतने खासगी जागेत अतिक्रमण केल्याची पहिलीच घटना तालुक्यात घडली असवी. ग्रामपंचायत सुरक्षा भिंतीचे बांधकाम पूर्ण करणार काय? तक्रार कर्त्यास न्याय मिळेल काय याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)