जिल्ह्यात नक्षल सप्ताहात सर्व कामे सुरळीत

By Admin | Updated: July 29, 2016 01:46 IST2016-07-29T01:46:50+5:302016-07-29T01:46:50+5:30

दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षल सप्ताह असतो. या सप्ताहात अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त परिसरात बंद पाळले जाते.

All the works are done in the naxalite week | जिल्ह्यात नक्षल सप्ताहात सर्व कामे सुरळीत

जिल्ह्यात नक्षल सप्ताहात सर्व कामे सुरळीत

गोंदिया : दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षल सप्ताह असतो. या सप्ताहात अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त परिसरात बंद पाळले जाते. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी (दि.२८) जिल्ह्यात सर्वत्र कामे सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.
चिचगड-ककोडी परिसरातील गणुटोला, चिपोटा, उचेपूर, मुरमाडी, चिल्हाटी येथे शेतकऱ्यांचे काम सुरू होते. तसेच सदर सप्ताहाला चिचगडवरून कोरची-नवेगावबांध, ककोडीवरून नागपूर, गोंदियावरून ककोडीला जाणारी टपाल बस सुरू होती. मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेसही सुरू होत्या.
चिचगड ते कोरची, चिचगड ते नवेगावबांध, चिचगड ते ककोडी मार्गावर नेहमीप्रमाणे आॅटो व दुचाकीवरून ग्रामस्थांची रहदारी सुरू होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आश्रमशाळा, कॉलेज व इतर शाळा सुरू होत्या. शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे परिसरातील सर्व शेतकरी आपल्या कामात व्यस्त होते.
प्रतिनिधीने चिचगडचे ठाणेदार अशोक तिवारी व देवरीचे ठाणेदार राजेंद्र तिवारी यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता, दुकाने व दळणवळणाची साधने चालू आहेत. परिसरात कुठेही बंद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: All the works are done in the naxalite week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.