पाणी बचतीसाठी सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा

By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:59+5:302016-03-20T02:13:59+5:30

२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.

All sections should take the initiative to save water | पाणी बचतीसाठी सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा

पाणी बचतीसाठी सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा

दिलीप गावडे: जल जागृती सप्ताहाचे उद्घाटन
गोंदिया : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त १६ मार्च ते २२ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात जिल्हा, तालुका व गावस्तरावर विविध उपक्रमाद्वारे जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये सर्व विभागांनी आपल्या योजना प्रभावीपणे गावस्तरावर पोहोचवितांना पाणी बचतीसाठीही पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन मार्फत बुधवारी (दि.१६) जल जागृती सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, माधुरी पातोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण अंबादे यांचेसह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना गावडे यांनी, जल जागृती सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविताना सर्व कार्यालय व ग्रामपंचातीमध्ये जलपूजन करण्यात यावे. तसेच या सप्ताहादरम्यान सर्व ग्रामपंचायतींमध्ये घरगुती पाणी वापराबाबत बचतीचे उपाय, पाण्याची साठवण व संकलन, पाण्याचा अपव्यय टाळणे व तेथील यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यासाठी काळजी घ्यावयाची आहे. तसेच शालेय पातळीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष सभा घेऊन पाणी बचत व पाणी गुणवत्ता या विषयावर मार्गदर्शन करण्यात यावे, शालेयस्तरावर दि.१६ ते २२ मार्च २०१६ दरम्यान जलपूजन, जलदिंडी व जलपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे सांगीतले.
जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी, पाणी बचत ही आजच्या काळाची गरज आहे. आपणास मुबलक पाणी उपलब्ध आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती आपल्यापेक्षा खूप बिकट आहे. करिता आपणही याबाबत विचार करून आपल्या पुढील पिढीसाठी पाणी पुरेल या उद्देशाने पाणी बचतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना केले.

Web Title: All sections should take the initiative to save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.