एकजुटीचा संकल्प घेऊन सारेच धावले...
By Admin | Updated: January 4, 2015 23:15 IST2015-01-04T23:15:39+5:302015-01-04T23:15:39+5:30
एकजुटीचा संकल्प घेवून विविध वयोगटातील ४०० स्पर्धकांनी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर पार केले. सदर मॅराथॉन स्पर्धा कुडवा येथील सोडा हबजवळून सुरू झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,

एकजुटीचा संकल्प घेऊन सारेच धावले...
जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धा : १२ किमीच्या अंतराची दौड
गोंदिया : एकजुटीचा संकल्प घेवून विविध वयोगटातील ४०० स्पर्धकांनी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर पार केले. सदर मॅराथॉन स्पर्धा कुडवा येथील सोडा हबजवळून सुरू झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया व विदर्भ स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धा रविवारी ४ डिसेंबरला पार पडली.
कुडवा येथून स्पर्धकांना कारंजा येथील पोलीस मुख्यालयापर्यंत धावत जायचे व तिथून कुडवा येथे परतायचे होते. जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा दिनेश दसरे हा सकाळी ८ वाजता कुडवा येथून धावत निघून अवघ्या २४ मिनिटात कारंजा येथील पोलीस मुख्यालयात पोहचला. तर तिथून कुडवा येथे २२ मिनिटे १२ सेकंदात कुडवा येथे परत पोहचला.
अतिथी म्हणून प्रा. एम.डी. कायरकर, के.व्ही. सार्वे, गोंदियाचे राष्ट्रीय धावक मुन्नालाल यादव, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरील अरूणा गंधे, एम.ए. काजी, नितीन तोमर, संजय मेश्राम, बापी लांजेवार, शेंडे, कस्तुरा भांडारकर, मंगेश सार्वे, मनिष भंडारकर, मिहीर परमार, संतोष शेंडे, अमरदीप ठाकरे, अवधेशसिंह बैस, हेमराज बोपचे, नारायण बावणकर, रवी पटले उपस्थित होते.
विशेष म्हणजे जिल्हावासीयांना एकजुट करण्यासाठीच सदर जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन यावर्षी प्रथमच करण्यात आले होते. यानंतर आता ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येईल, असे विदर्भ स्पोर्ट अॅकादमीचे सचिव व आयोजक मनोज भांडारकर यांनी सांगितले. सदर मॅराथॉन स्पर्धेला १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)