शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चारही मतदारसंघ महायुतीच्या पारड्यात; महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:46 IST

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : चेहराबदल, मतदारसंघाबाहेरील उमेदवार देणे काँग्रेसला भोवले; महायुतीच्या एकसंघ वज्रमुठीने विजयाचा मार्ग केला सुकर

गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी (दि.२३) जाहीर झालेल्या निकालाने जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा चारही मतदारसंघांतून सुपडा साफ केला, गोंदिया विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी या मतदारसंघात कमळ फुलवीत प्रथमच इतिहास घडवला. तिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी विजयाची हॅटट्रिक साधत रेकॉर्ड स्थापन केला. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले व आमगाव मतदारसंघातून भाजपचे संजय पुराम यांनी जोरदार कमबॅक करत मतदारसंघात इतिहास घडवला आहे. 

"मतदारसंघातील समस्त जनता व कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा विजय अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील जनतेने नेहमीच आपल्याला साथ दिली. हा विजय जनतेच्या प्रेम आणि विश्वासाचा विजय होय. जनतेने पुन्हा विकासाला साथ दिल्याची पावती आहे. खा. प्रफुल्ल पटेल व महायुतीच्या नेत्यांनी आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरविला. यात समस्त कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे." - राजकुमार बडोले, आमदार, अर्जुनी-मोरगाव

विजयाची कारणेसाधा माणूस अशी प्रतिमा व मतदारसंघात कायम ठेवलेला जनसंपर्क, खा. प्रफुल्ल पटेल व महायुतीची मिळालेली भक्कम साथ, महायुतीच्या विकासात्मक योजना, लाडक्या बहिणींची मिळालेली साथ. 

जनतेने पुन्हा विकासाला प्राधान्य देत साथ दिली "तिरोडा विधानसभा मतदारसंघातील जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास आणि प्रेम कायम ठेवले असून, हा विजय त्याचीच पावती आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन महिने घेतलेले परिश्रम आणि नेते आणि पदाधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधत केलेल्या नियोजनाने विजयाचा हा पल्ला गाठण्यात यश आले. हा विजय जनतेला समर्पित आहे."- विजय रहांगडाले, आमदार, तिरोडा

विजयाची कारणे गेली १० वर्षे मतदारसंघात केलेली विकासकामे ही जमेची बाजू ठरली. आपला माणूस आणि मतदारसंघाशी जुळलेली नाळ वरली प्रभावी. महायुतीतील घटक पक्षांचा योग्य समन्वय आणि मिळालेली भक्कम साथ.

हा विजय महायुतीचे कार्यकर्ते अन् सर्वसामान्य जनतेचा "आजचा विजय हा महायुतीच्या समस्त कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ असून, सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा आधीपेक्षा अधिक विश्वास महायुतीवर व्यक्त केला आहे. या विजयात लाडक्या बहिणींनासुद्धा विसरून चालणार नाही. त्याही विजयाच्या शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो." - विनोद अग्रवाल, आमदार, गोंदिया

विजयाची कारणे महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराचे केलेले सूक्ष्म नियोजन व व्यापक जनसंपर्क, गत पाच वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारसंघाची बांधणी. मतदानाचा टक्का वाडविण्यात लाडक्या बहिणींची मिळालेली साथ.

हा जनतेच्या प्रेम आणि विश्वासाचा विजय "आमगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने सर्व अंदाज खोटे ठरवत आपल्यावर प्रेम आणि विश्वास कायम ठेवीत संधी दिली. त्यामुळे हा विजय जनतेचा आणि महायुतीच्या समस्त कार्यकर्त्यांचा आहे. जनतेने पुन्हा एकदा विकासकामांना प्राधान्य देत महायुतीला भक्कम साथ दिली आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही." - संजय पुराम, आमदार, आमगाव

विजयाची कारणेपदावर नसतानाही मतदारांशी कायम ठेवलेला जनसंपर्क, निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांची मिळालेली भक्कम साथ. लाडकी बहीण योजना व महायुतीची विकासकामे ठरली प्रभावी. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024gondiya-acगोंदियाarjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावtirora-acतिरोडाamgaon-acआमगावMahayutiमहायुतीBJPभाजपा