शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सर्वच बाबतीत विद्यमान सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:23 PM

निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : डुंडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र मागील साडेचार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही. उलट देशात नेमके या विरोधात चित्र आहे. त्यामुळे विद्यमान सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील डुंडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व आदिवासी मेळावा सोमवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. मधुकर कुकडे, रमेश ताराम, मनोहर चंद्रिकापुरे, निता मेश्राम, गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, अविनाश काशिवार, नरेश भेंडारकर, चंद्रकांत मरस्कोल्हे, इंजि. डी.यू.रहांगडाले, सुधाकर पंधरे, इंदू परशुरामकर, मंजू डोंगरवार, दिनेश कोरे, सचिन येसनसुरे, रुपविलास कुरसुंगे, एफ.आर.टी.शहा, सुनिता चिंधालोरे, बंटी भाटीया, सी.के. बिसेन, सेवकराम रहांगडाले, अनिता बाबोडे, डॉ.वाढई, उषा रहांगडाले, सुधा रहांगडाले, हटवार, क्रिष्णा सुरसाम, भरतलाल ठलाल, चंदन ठलाल व आदिवासीबांधव उपस्थित होते. खा.पटेल व कुकडे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पटेल म्हणाले, सरकारने अलीकडे गावागावातील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील चुलबंद, गोसेखुर्द, भिमलकसा, बावणथडी या धरणाची निर्मिती आमच्या सरकारच्या कार्याकाळात करण्यात आली.विद्यमान सरकारने मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात एकही मोठा सिंचन प्रकल्प मार्गी लावला नाही. उलट भेलसारखा मोठा उद्योग बंद पाडण्याचे काम केले. केंद्र व राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यास धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीेभाव देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिन विकास हेच आपले ध्येय आहे.आदिवासी समाजाच्या विकासात क्रांतीसूर्य विर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पुतळा उभारण्यासाठी डुंडा येथील आदिवासीबांधवानी मनोहर चंद्रिकापूरे व निता मेश्राम आभार मानले. डुंडा येथील विठ्ठल रुखमाई मंदिराला तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन पटेल यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन अनिरुद्ध बांबोडे यांनी केले तर आभार अविनाश काशिवार यांनी मानले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल