अशोक वॉर्डातील बारविरूद्ध एल्गार

By Admin | Updated: March 22, 2015 00:43 IST2015-03-22T00:43:13+5:302015-03-22T00:43:13+5:30

महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार एकीकडे देश व्यसनमुक्त करण्याचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे गावागावात दारुचे परवाने देत आहे.

Algor in the Ashok ward | अशोक वॉर्डातील बारविरूद्ध एल्गार

अशोक वॉर्डातील बारविरूद्ध एल्गार

तिरोडा : महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार एकीकडे देश व्यसनमुक्त करण्याचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे गावागावात दारुचे परवाने देत आहे. तिरोडा शहराच्या अशोक वार्डात नगर परिषदने वार्डातील नागरिकांना आंधारात ठेऊन २० डिसेंबर रोजी मादोराव लक्ष्मण आगाशे यांना बियर बारचे नाहरकत प्रमाणपत्र दिले. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.
त्या ठिकाणी हनुमंताचे, विठ्ठल रुख्मिनीचे मंदीर असून बाजूला तलाव आहे. त्या ठिकाणी वार्डातील शहरातील महिला मुली कपडे धुण्याकरीता जात असतात. त्या ठिकाणी चैत्र नवरात्रीला मंदीरात कलश असतात. त्या तलाव गणेश उत्सवात श्रीकृष्ण जन्माष्टमी, काजळतील त्या विसर्जनासाठी नागरिक महिला जातात. शाळकरी लहान विद्यार्थी त्या मार्गाने जात असतात. धार्मिक स्थळाकडे जाणारा शहरातील मुख्य मार्ग असल्याने त्या ठिकाणी दारु दुकानाची परवानगी ही समाजात दशहत पसरविण्यासारखी आहे. बार मध्ये नागरिक वाईट कृत्य करीत असतात. अशात अशोक वार्डातील महिलांना घराबाहेर निघणे कठिण झाले आहे. आधिच भर चौकात तीन चार चुकाने आहेत. महिला त्या पासून फार त्रस्त आहेत.
अशात आणखी एका बारचा परवाना देण्यात आल्याने येथील महिला खळवल्या आहेत. अशोक वार्डातील परवानगी रद्द करण्याची मागणी तुलसी महिला बचत व सुनिता शहारे, रत्नमाला शहारे, लता शहारे, अनुसया शहारे, छाया राबते, माधुरी मलघाटे, छाया मलघाटे, रेखामुरे, सुनीता मलघाटे, अर्चना शर्मा, चंद्रकांता शर्मा, अक्षरा मुरे, माया मलघाटे, गीता शहारे, यांनी केली आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क तहसीलदार जिल्हाधिकारी, आमदार, खासदार व सर्व संबंधित विभाग व नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी ही पत्र दिले आहे.
येथील दारुदुकाने बंद न झाल्यास महिला मानवाधिकार संघटना, संपुर्ण शहरातील वार्डातील महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही अप्रिय घटना शहरात वार्डात घडल्यास नगर परिषद प्रशासन जवाबदार राहील असे सांगून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Algor in the Ashok ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.