खमारीत दारुबंदीचा एल्गार

By Admin | Updated: April 26, 2017 00:39 IST2017-04-26T00:39:33+5:302017-04-26T00:39:33+5:30

दारुमुळे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने दारुचा गावातून समूळ नायनाट करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या खमारी येथील

Algarr of Alcohol | खमारीत दारुबंदीचा एल्गार

खमारीत दारुबंदीचा एल्गार

इशाऱ्याने विक्रेते दणाणले : दारु विकल्यास याद राखा
गोंदिया : दारुमुळे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने दारुचा गावातून समूळ नायनाट करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या खमारी येथील महिलांनी सरपंच विमला तावाडे यांच्या नेतृत्वात गावात जोरदार मोर्चा काढून दारुबंदीविरूद्ध एल्गार पुकारला.
खमारी येथे परवानाप्राप्त दारु विक्रीची दुकाने ५०० मिटरमुळे बंद पडली. परंतु अवैध दारुचा महापूर वाहात असल्यामुळे गावाचे वातावरण दूषित होत आहे. लहान मुले, तरुण व्यवसनाच्या आहारी जात आहेत. या व्यसनापासून तरुण, इसम व मुलांना दूर ठेवण्यासाठी गावातील अवैध दारु, जुगार याविरुद्ध कंबर कसून गावात २५ एप्रिल रोजी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेला ३०० पेक्षा अधिक महिलांची हजेरी होती.
गावात कोणतेही अवैध धंदे होणार नाही असा एकमुखी ठराव घेऊन नंतर अवैध दारुच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. गावातील अवैध दारु विक्रेत्यांना महिलांनी तंबी दिली.
गावाला व्यसनमुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी सरपंच विमला तावाडे, उपसरपंच कैलाश साखरे, पोलीस पाटील मनोहरसिंह चव्हाण, राधेश्याम तावाडे, अप्पू लिल्हारे, जि.प. सदस्य विठोबा लिल्हारे, महेंद्र बनकर, महेंद्र मेंढे, मंडळ अधिकारी बिटकर, विजू उके, अध्यक्ष आशा शिवणकर, माधुरी बोहरे, मालती जमनारायण बोहारे, माधुरी मेंढेकर, गुलकन बलभद्रे, सविता बावणकर, सीमा मानकर व इतर गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. महिलांच्या या भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Algarr of Alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.