छत्तीसगडच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST2021-04-05T04:26:22+5:302021-04-05T04:26:22+5:30
गोंदिया : लगतच्या छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पाेलिसांनी रविवारी ...

छत्तीसगडच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अलर्ट
गोंदिया : लगतच्या छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पाेलिसांनी रविवारी (दि. ४) हायअलर्ट जारी केला आहे. तसेच नक्षलवाद्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे. नक्षलवादी फेब्रुवारी ते जून याकाळात पीसीओ सप्ताह चालवतात. या दरम्यान गोरगरिबांचा फायदा घेऊन त्यांना नक्षल चळवळीत येण्यास प्रवृत्त केले जाते. याच काळात नक्षलवादी हिंसक कारवाया करतात. या हिंसक घटनांवर आळा घालण्यासाठी गोंदिया पोलिसांनी अलर्ट घोषित केला आहे. गोंदिया पोलीस नियमित ऑपरेशन राबवत आहेत. जिल्ह्याच्या सीमेला महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा, मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यांच्या सीमा लागून आहेत. या तीन राज्यांच्या सीमांचा फायदा नक्षलवाद्यांना पळून जाण्यासाठी होतो. नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गोंदिया पोलीस कामाला लागले आहे.