दारूची वाहतूक करणाऱ्यास पकडले
By Admin | Updated: July 2, 2017 00:29 IST2017-07-02T00:29:11+5:302017-07-02T00:29:11+5:30
बॅगमध्ये दारू घेऊन अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या युवकास रेल्वे सुरक्षा बलच्या पथकाने तपासणी दरम्यान पकडले.

दारूची वाहतूक करणाऱ्यास पकडले
देशी-विदेशी दारू जप्त : गोंदिया- चंद्रपूर गाडीतील कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बॅगमध्ये दारू घेऊन अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या युवकास रेल्वे सुरक्षा बलच्या पथकाने तपासणी दरम्यान पकडले. बुधवारी (दि.२८) गाडी क्रमांक ५८८०६ गोंदिया-चंद्रपूर गाडीत गोंदिया ते सौंदड दरम्यान ही कारवाई करण्यात आली. युवकाकडून देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
दारूची वाहतूक करणाऱ्या युवकाचे नाव थामदेव देवाजी वाडके (३८,रा.टरंबा,चंद्रपूर) असे आहे. गाडीत बॅगमध्ये दारू घेऊन ते बसला असता तपासणी दरम्यान पोलिसांच्या हाती तो लागला. त्याच्या बॅगमध्ये मॅकडॉवलचे १८० मीलीच्या ४८ बॉटल्स व टँगोपंचच्या ९० मीलीच्या १० बॉटल्स मिळून आल्या.
गोंदिया येथून दारू खरेदी करून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ही दारू नेत असल्याचे थामदेवने कबूल केले. पोलिसांनी मुुंबई पोलीस कायदा कलम ६५(अ)(ई) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.